छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अख्ख्या महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवणारे, अवघ्या मराठीजनांना खिळवून ठेवणारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांची वृद्धापकाळाने व न्यूमोनिया झाल्याने प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. उपचार चालू असताना आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे.
आज सकाळी (ता.15) साडे आठ वाजता त्यांचे पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे व आज सकाळी ठीक साडे दहा वाजता (10.30 वाजता) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात नुकतंच पदार्पण केलं होतं.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महान कार्याविषयी..
छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्य अशा राजा शिवछत्रपती नाटकाची निर्मितीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केली होती. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी सासवडला झाला. त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्तऐवज, गडकिल्ले, मराठा सम्राज्याचा सखोल अभ्यास केला. पुण्यामधील भारत इतिहास संशोधक मंडळासोबत सुद्धा त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते.
जाणता राजा हे नाटक त्यांनी लिहिले. पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 रोजी सादर केला गेला होता. 19 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या 93 व्या वाढदिवशी त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते आणि 2019 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यांसारख्या अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी बाबांना सन्मानित करण्यात आले होते. फुलवंती’ आणि ‘जाणता राजा’ ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं लेखन: आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्यांचा सरकारवाडा, पुरंदर्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511