SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतात ‘बिटकाॅईन’चे काय होणार..? ‘क्रिप्टोकरन्सी’बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलन.. चलनी नोटांना पर्याय म्हणून वापरली जाणारी डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी.. कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. क्रिप्टोकरन्सीतील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे, बिटकाॅईन..!

बिटकाॅईन शिवाय इथेरिअम, लाईटकॉईन, रिपल, डॅश, मोनेरो, डॉजकॉईन अशा अनेक क्रिप्टो करन्सी सध्या चलनात असल्या, तरी त्या बिटकॉईनच्या जवळपासही नाहीत. शिवाय त्यांच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जातात.

Advertisement

अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिली आहे.. इतकंच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे. मात्र, भारतात अजून हे चलन तितकेसे लोकप्रिय झालेले नाही. मात्र, काही प्रमाणात त्याचा वापर केला जातो..

भारतात क्रिप्टोकरन्सी टिकणार का, यावर नुकतीच संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. क्रिप्टोकरन्सीबाबतची अनिश्चितता लक्षात घेता, सरकारने त्यावर बंदी घालावी, अशीही मागणी काहींनी केली. मात्र, केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यास विरोध दर्शविला आहे.

Advertisement

क्रिप्टोकरन्सीवर बंदी नाही
क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल चलनातील गुंतवणुकीवर बंदी घालता येणार नाही. उलट येणाऱ्या काळात डिजिटल चलनात गुंतवणूक करणे नियमनाच्या कक्षेत आणण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले.

स्थायी समितीचे अध्यक्ष भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुंतवणूकदारांच्या भांडवलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

Advertisement

संसदीय समितीच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी नियामक यंत्रणा तयार करण्याचे ठरले. क्रिप्टोकरन्सीबाबतच्या नियामकाची भूमिका कोणाकडे सोपवायची, हे उद्योग विश्वातील काही सदस्य आणि इतर भागधारकांना अद्याप स्पष्ट झालेले नाही.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement