SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘अ‍ॅमेझॉन’वरुन चक्क गांजाची तस्करी, आरोपींच्या कारनाम्याने पोलिसही चक्रावले.. नेमका काय प्रकार आहे, वाचा

अ‍ॅमेझॉन… ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट.. अनेक जण या वेबसाईटवरुन आपल्या आवडीच्या वस्तू मागवित असतात. मात्र, या वेबसाईटवरुन चक्क गांजाची तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ते पाहून पोलिसही चक्रावले आहेत..

गेल्या चार महिन्यांपासून कडीपत्त्याच्या नावाखाली हा काळा धंदा सुरु होता. आंध्र प्रदेशातील एक आरोपी अ‍ॅमेझॉनवर कडीपत्त्याच्या नावाखाली गांजाची विक्री करीत होता. ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर मोठ्या शहरांमध्ये गांजाचा पुरवठा करीत असल्याचे तपासात समोर आलेय..

Advertisement

अखेर ही बाब पोलिसांसमोर आली.. पोलिसांनी एका मोठ्या गांजा विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना, सुमारे २० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. सूरज ऊर्फ कल्लू पवय्या व पिंटू उर्फ बिजेंद्र सिंह तोमर, अशी त्यांची नावे आहेत..

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘अ‍ॅमेझॉन’च्या माध्यमातून विशाखापट्टणम येथून मध्य प्रदेशमध्ये हा २० किलो गांजा मागविण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी छापा घालून हा सगळा माल जप्त केला व वरील दोन आरोपींना ताब्यात घेतलं.

Advertisement

चार महिन्यांत १ काेटींची तस्करी
गेल्या ४ महिन्यांत ‘अ‍ॅमेझॉन’वरुन निर्बंध घातलेला हा मादक पदार्थ मागविण्यात येत होता. आतापर्यंत या आरोपींनी १ कोटी १० लाख रुपयांच्या एक टन गांजाची तस्करी केल्याचे पोलिस तपासात समोर आलेय. या दोन आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याला हरिद्वार येथून पकडण्यात आले आहे.

गांजा प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, कुठे कुठे हा माल विकण्यात आला, याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहेत. चक्क ‘अ‍ॅमेझॉन’वरुन गांजाची तस्करी करण्यात आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत..

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement