SpreadIt News | Digital Newspaper

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत, मुंबई पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल..

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. पॉर्नोग्राफी प्रकरणातून काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा जामिनावर बाहेर आला, त्यानंतर पुन्हा एकदा राज कुंद्रासह शिल्पा शेट्टीही नव्या प्रकरणात अडकले आहेत..

मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टीची चौकशीही करण्यात आल्याचे समजते.

Advertisement

नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्याविरोधात ही तक्रार दिली आहे. नितीन बरई यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे, की शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून आपली 1.51 कोटींची फसवणूक केली.

बरई यांच्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये एसएफएल (SFL) फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी बरई यांना फिटनेस व्यवसायात 1 कोटी 51 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

Advertisement

त्यांच्या कंपनीची फ्रंचायजी घेऊन पुण्याच्या कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केल्यास खूप फायदा होईल, असे आमिष दाखविण्यात आले. मात्र, त्यातून काहीही लाभ न झाल्याने बरई यांनी पैसे परत मागितले असता, त्यांना धमकाविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बरई यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणी सर्वांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement