SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 5000 रुपये येणार, अतिरिक्त फायदा मिळणार, कसा तो वाचा..?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, अर्थात पीएम किसान योजना.. मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (2 हेक्टरपेक्षा कमी शेती) 2019 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्रत्येकी 2000 रुपये 3 हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जातात.

मोदी सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 9 हप्ते दिले असून, येत्या डिसेंबरमध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. मात्र, या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नव्हे, तर पाच हजार रुपये मिळणार आहेत. हे अतिरिक्त पैसे शेतकऱ्यांना कसे मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी दुसरी एक योजना सुरु केलेली आहे.. ‘पीएम किसान मानधन योजना’ असे त्याचे नाव.. या योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठीनंतर शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणीही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करु शकतो.

Advertisement

असे मिळणार 5000 रुपये
पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत प्रत्येकी 2000 रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याचे वय 60 वर्षांहून अधिक असेल आणि त्याने ‘पीएम किसान मानधन पेन्शन योजने’तही नोंदणी केलेली असेल, तर शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यात तीन हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत, म्हणजेच 2 हजारांचा हप्त्याऐवजी आता पाच हजार रुपये मिळणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
‘पीएम किसान मानधन पेन्शन योजने’मध्ये नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबूक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.

Advertisement

मोदी सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेसाठी भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये हंस्तांतरित केले आहेत. येेत्या 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला हा हप्ता मिळाला होता.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement