टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करताना पहिल्यांदाच ‘टी-20 वर्ल्ड कप’ जिंकला. ऑस्ट्रेलियाने याआधी पाच वन-डे जिंकले आहेत. टी-२० वर्ल्ड कपसह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 6 वर्ल्ड कप झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या इनिंगचा हिरो ठरला, मिचेल मार्श.. एका बाजूला विकेट पडत असतानाही, त्याचा मार्शच्या खेळीवर कोणताही परिणाम झाला नाही. केवळ ५० बाॅलमध्ये नाबाद ७७ धावा (६ चौकार, ४ षटकार) करताना, त्याने ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून दिला.
न्यूझीलंडने दिलेले 173 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केलं. मिचेल मार्शला सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर (38 बॉल, 53 रन) चांगली साथ दिली. वाॅर्नर आऊट झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने (18 बॉल, नाबाद 28) मिचेलने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडकडून फक्त ट्रेन्ट बोल्ट यशस्वी ठरला. 4 ओव्हरमध्ये 18 रन देताना बोल्टने 2 विकेट घेतल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी न्युझीलंडच्या बाॅलरची धुलाई केली. बोल्टशिवाय कोणलाही विकेट मिळाली नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. केन विलियमसनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर 173 रनचं आव्हान दिलं.
केन विलियमसनने 48 बॉलमध्ये 85 धावांची खेळी केली. मार्टिन गुप्टीलने 28 धावांची संथ खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. एडम झम्पाला एक विकेट मिळाली. मात्र, मिचेल स्टार्कने त्याच्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 60 रन दिले.
वर्ल्ड कप सुरू होण्याआधी हे दोन्ही संघ विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात नव्हते. स्पर्धा जसजशी पुढे गेली, तसतशी दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली. या दोन्ही संघांना एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. अखेर ऑस्टेलियाने हा डागही पुसून काढला..
न्यूझीलंडचे अपयश
न्यूझीलंडची टीम 2015 आणि 2019 च्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली, पण दोन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये केन विलियमसनच्या टीमने भारताचा पराभव केला होता.. वर्षातली दुसरी ट्रॉफी जिंकण्यात किवी टीमला अपयश आलं.
आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडला एकदाही ऑस्ट्रेलियाला हरवता आलेलं नाही. यंदाही हे रेकॉर्ड कायम राहिला. ऑस्ट्रेलियाने आणखी एक ट्राॅफी आपल्या नावे केली..
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511