SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, मुंबईत महिला कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, संपाबाबत तोडगा नाहीच..

एसटी महामंडळाचे शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज आठवा दिवस आहे… गेल्या 8 दिवसांपासून सरकार व एसटी कर्मचारी संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्याने हे आंदोलन चिघळताना दिसत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज (ता. 14) वेगळेच वळण मिळाले. मागील काही दिवसांत अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना मुंबईत आज ३-४ संपकरी महिला कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच महिलांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. मागील आठ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, त्यात काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे.

एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून कर्मचारी संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे.

Advertisement

प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केल्यानं संपकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आज पुन्हा चर्चा होणार
‘संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ’ असा शब्द परिवहन मंत्री परब यांनी दिला असला, तरी संप अजूनही मागे घेण्यात आलेला नाही. मंत्री परब यांच्याशी चर्चा करण्यासाठी आजही कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. त्यात काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement