SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी बँकांसोबत बँक मित्र म्हणून काम करा आणि महिन्याला 5000 रुपये कमवा; जाणून घ्या..

कोरोनाच्या काळात लोकांना अनेक आर्थिक समस्या आल्या आहेत, त्यामुळे ऐन वेळेस नोकऱ्या गेल्यानंतर लोक निश्चित उत्पन्न असलेल्या नोकऱ्यांच्या शोधात आहेत. जमेल ते काम करायला कोणी कोणी तयार होतंय. अशा वेळेस बँकिंग, फायनान्स, डिजिटल बिझनेस वगैरे जास्त चालायला लागले.

जर तुम्हालाही वाटत असेल की, आपल्यालाही दर महिन्याला फिक्स्ड इन्कम (Earn money) कमवता आला, तर जाणून घ्या की तुम्हाला ही संधी एका जागेवर बसून मिळणार आहे. यासाठी कुठे फिरण्याचीही गरज नसणार आहे. कारण तुम्ही सरकारी बँकेच्या माध्यमातून दर महिना चांगली कमाई करू शकणार आहात.

Advertisement

तर जाणून घ्या की, तुम्हाला एखाद्या सरकारी बँकेसोबत (Government Bank) कमाई करायची असेल तर तुम्ही बँक मित्र (Bank Mitra) बनू शकता. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (State Bank of India) वेळोवेळी बँक मित्रसाठी (Bank Mitra) अर्ज मागवते.

बँक मित्र म्हणजे काय?

Advertisement

देशातील अशी व्यक्ती जी व्यक्ती बँक खाते उघडणे, विमा करणे, पैसे काढणे, पैसे जमा करण्यासह इतर बँकेच्या सुविधेचा लाभ लोकांना मिळावा यासाठी मदत करते त्यांना बँक मित्र म्हणतात. याविषयी आपल्याला बँकेत जाऊन चौकशी करावी लागेल किंवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन माहीती घ्यावी लागेल.

‘या’ कागदपत्रांची आवश्यकता…!

Advertisement

▪️ ओळखपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वोटर आयडी कार्डची कॉपी.
▪️ पात्रतेसाठी 10वी पासचे मार्कशीट आणि वर्तणूक दाखला.
▪️ व्यावसायिक पत्त्यासाठी विज बिल, टेलीफोन बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्टची कॉपी.
▪️ पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुकची कॉपी किंवा कॅन्सल चेक. (संबंधित बँकेच्या नियमानुसार कागदपत्र कमी किंवा अधिक लागू शकतात.)

दर महिन्याला 5000 रुपये कमाई ?

Advertisement

तुम्ही एखाद्या सरकारी बँकेचे बँक मित्र बनल्यानंतर बँकेच्या काही सर्व्हिसेस बँकेमार्फत ग्राहकाला तुम्ही प्रदान केल्यास तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचे खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, क्रेडिट कार्डचे आणि विविध बिल पेमेंट केल्यानंतर बँक बँक मित्राला कमीशन म्हणून काही पैसे (Earn Money) देत असते.

तर पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) अंतर्गत, देशातील सर्व बँक मित्रांना 1.25 लाख रुपयांचे कर्जसुद्धा दिले जात असल्याची माहीती आहे. ग्राहक याविषयी अधिक माहीती बँकेत जाऊन घेऊ शकता. ज्यामध्ये 50,000 रुपयांचे कर्ज सामान इत्यादीसाठी, 25,000 रुपयांचे कर्ज कामासाठी आणि 50,000 रुपयांचे कर्ज वाहनासाठी दिले जाते. यानंतर बँक मित्राला दरमहिना 2000 ते 5000 रुपये मानधन बँकेकडून दिले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement