SpreadIt News | Digital Newspaper

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार ‘इतके’ लाख रुपये..

देशातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी (EPFO Employees) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

केंद्रीय मंडळाने EPFO ​​(ईपीएफओ) कर्मचार्‍यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांना देण्यात येणार्‍या एक्स-ग्रेशिया डेथ रिलीफ फंडाची (Ex-gratia Death Relief Fund) रक्कम दुप्पट केली असल्याचं समजतंय. भारतातील या संस्थेच्या 30 हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यामध्ये निधीत केलेली ही वाढ तात्काळ लागू करण्यात आली आहे. यासाठी ईपीएफओने सर्व कार्यालयांना परिपत्रक जारी केलंय.

Advertisement

EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकात काय?

कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास आता त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना 8 लाख रुपये मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Advertisement

या निधीच्या माध्यमातून 2006 मध्ये कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्यां व्यक्तींना फक्त 5000 रुपये एवढी रक्कम मिळायची. देण्यात येणारी ही रक्कम कालांतराने वाढून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आणि आता अखेर ती तब्बल 4.20 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला समान रक्कम मिळणार आहे.

तसेच या निधीमध्ये आता दर 3 वर्षांनंतर 10 टक्के वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ईपीएफओ सदस्यांनी अशी मागणी केली होती की, अकस्मात मृत्यू झाल्यास किमान 10 आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपये द्यावेत.

Advertisement

अधिक माहीती अशी की, कल्याण निधीतून या रकमेची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, केंद्रीय कर्मचारी कल्याण समिती आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्या मंजुरीने ही रक्कम वाढवण्यात आली आहे. EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघाती, नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 8 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement