SpreadIt News | Digital Newspaper

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेबाबत मोठी बातमी, ‘आयसीसी’ने दिले महत्वपूर्ण अपडेट, जाणून घेण्यासाठी वाचा..

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची जगभरातील क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा असते. मात्र, दोन्ही देशामधील ताणलेल्या संबंधामुळे 2012-13 नंतर भारत-पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही..

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शेवटची टेस्ट सीरिज 2007 साली भारतात झाली होती. नंतर 2009 मध्ये टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती; पण त्याच वेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला नि नंतर भारताने हा दौरा रद्द केला. तेव्हापासून दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध संपुष्टात आले आहेत.

Advertisement

आता या टीम फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरूद्ध खेळतात. सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर भारत-पाक यांच्यात सामना झाला. जगभरातील तब्बल 167 मिलियन (16.7 कोटी) प्रेक्षकांनी हा सामना पाहिला.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एका मॅचसाठी एवढ्या मोठ्या प्रेक्षक संख्येचा हा रेकॉर्ड आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाक संघाने भारताचा पराभव केला. वर्ल्ड कप इतिहासात प्रथमच पाककडून टीम इंडियाचा पराभव झाला.

Advertisement

पाकिस्तान संघाकडून झालेला पराभव भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला असून, त्याचा वचपा कधी निघतोय, याची भारतीयांना उत्सुकता आहे. मात्र, आता पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतच भारत-पाक सामना होऊ शकतो.

भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार का, असा प्रश्न दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आत याबाबत खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, अर्थात ‘आयसीसी’ने (ICC) महत्त्वाचे अपडेट दिले आहेत.

Advertisement

भारत-पाकिस्तान मालिकेबाबत ‘आयसीसी’चे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस  (Geoff Allardice) यांनी दुबईत माध्यमांना माहिती दिली.

‘आयसीसी’ हस्तक्षेप करणार नाही…
ते म्हणाले, की “द्विपक्षीय सीरिजमध्ये ‘आयसीसी’ची कोणतीही भूमिका नसेल. ‘आयसीसी’ स्पर्धेत भारत-पाक यांच्यात मॅच होते, त्याचा आम्हाला आनंद आहे; पण दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डातील संबंधावर ‘आयसीसी’ काहीही प्रभाव टाकू शकत नाही.”

Advertisement

“भारत-पाक क्रिकेट बोर्डात सहमती झाल्यास या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होऊ शकते. मात्र, त्यांच्यात सहमती होत नसेल, तर मालिका होणार नाही. भारत-पाकिस्तानमधील सामना पाहायला आम्हालाही आवडतं, परंतु द्विदेशीय मालिका खेळवायची की नाही हा उभय संघांच्या बोर्डाचा प्रश्न आहे.”

“भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता, येत्या काळात त्यांच्यात क्रिकेट मालिका होणे अशक्य आहे. आयसीसी यात कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करणार नाही,” असे ज्योफ यांनी स्पष्ट केले.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement