SpreadIt News | Digital Newspaper

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट, रोहितला विश्रांती.. कोण असणार कॅप्टन वाचा..?

टी-२० वर्ल्ड कप झाल्यावर न्यूझीलंड संघ युएईमधून थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी-२० सामने व 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, बीसीसीआयने आज (ता. 12 नोव्हेंबर) भारताच्या कसोटी संघाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे, या टेस्टसाठी विराट कोहलीसह रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात आली आहे. टेस्ट संघाच्या नेतृत्वाची हंगामी जबाबदारी मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याच्यावर सोपविण्यात आली आहे.

Advertisement

रोहित शर्मा टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, त्यानंतर तो पूर्ण कसोटी मालिका खेळणार नाही, तर विराट कोहली फक्त दुसरा कसोटी सामना खेळणार असल्याचे सांगण्यात आले.

भारत व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान खेळविला जाणार आहे, तर दुसरा कसोटी सामना मुंबईमध्ये ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

Advertisement

पुजारा असेल उपकर्णधार
पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करील, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा दिली जाणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. पंतच्या जागी वृद्धिमान साहा यष्टीरक्षण करणार आहे, तर के. एस. भरत या मालिकेत दुसरा यष्टीरक्षक असेल.

Advertisement

कोरोनामुळे भारतात बऱ्याच दिवसांपासून मालिका झालेली नाही. आयपीएल व टी-20 वर्ल्ड कपचे आयोजनही ‘बीसीसीआय’ला यूएईमध्ये करावे लागले. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर भारतात क्रिकेट सामने होणार आहेत.

राहुल द्रविडची नवी इनिंग
न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची निवड झाली असली, तरी नवीन कोचिंग स्टाफ निवडलेला नाही. या मालिकेपूर्वी बीसीसीआय कोचिंग स्टाफची निवड करु शकते.

Advertisement

सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड पदावर कायम राहू शकतात. तर टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील, असे सांगण्यात येते.

असा असेल भारतीय कसोटी संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), के. एल. राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement