SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी ‘या’ ॲपद्वारे होणार, शालेय शिक्षण मंत्री म्हणाल्या..

राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहीतीनुसार..

Advertisement

राज्यातील शाळांमध्ये असणारे विद्यार्थ्यां व शिक्षक यांची हजेरी डिजीटल पद्धतीने MahaStudent ॲपद्वारे ही नोंदवावी, यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने हजेरी लावली जाणार आहे आणि यासाठी गुण देखील देण्यात येणार आहेत.

Advertisement

राज्यामधील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्र राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक आणि शाळेमधील विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे.

तरी MahaStudent App हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अनुपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा त्यामध्ये दिली गेली आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.

Advertisement

MahaStudent ॲप डाऊनलोड करण्यासाठी..

👉 महास्टुडंट अ‌ॅप (MahaStudent mobile App Download) डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला भेट द्या.

Advertisement

👉 गुगल प्ले स्टोअरवर MahaStudent असं सर्च करा.

👉 Install वर क्लिक केल्यावर थोडं थांबा आणि मग इंस्टॉल झाल्यावर तिथे Open असा पर्याय येईल मग तिथे टॅप करा. ॲप ओपन होईल.

Advertisement

दरम्यान, या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपट वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement