SpreadIt News | Digital Newspaper

कोरोना लसीच्या दोन डोसशिवाय विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ‘नो एन्ट्री’..! प्राध्यापकांनाही सेवेतील लाभ मिळणार नाहीत..

कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगात पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले, तरी दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने काॅलेजमधील विद्यार्थी-प्राध्यापकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस झालेले नसल्यास आता काॅलेजच्या प्राध्यापकांना कुठलाही लाभ मिळणार नसल्याचा इशारा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

काॅलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांनाही कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागणार आहेत. लसीचे दोन्ही डोस पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाहीये. तसेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच आता ऑफलाईन परीक्षा देता येणार असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

प्राध्यापकांना सरकारी लाभ मिळणार नाही..
काॅलेजमधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांना कोणताही सरकारी लाभ दिला जाणार नसल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, की आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय, लसीचे दोन्ही डोस घ्या आणि विद्यार्थी म्हणाले, की आमच्या सरांनी एकच घेतलाय, तर त्याला आमच्याकडे कोणतेही उत्तर नसेल.. ऑनलाईन शिक्षण दिले जात असल्याने काही शिक्षक लस घेत नसल्याचे कानावर आले आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

Advertisement

कोरोना लसीचे डोस मोठ्या प्रमाणात पडून असतानाही, अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारने त्यामुळे कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement