SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

5G स्मार्टफोन घेणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी! भारतात सुरू होणार 5G सेवा..

भारतात 2G पासून झालेल्या सुरू झालेल्या प्रवासास 5G पर्यंत लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पुढील 6-7 महिन्यांमध्ये भारतात 5G सेवा देखील उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः याबाबत मोठी घोषणा केली आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार..

Advertisement

देशात 5G सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया ही लवकरच पार पाडली जाणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे. आगामी 6-7 महिन्यांतच म्हणजेच, पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत भारतात 5G सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

लिलाव प्रक्रियेसाठी असणारे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून (TRAI) निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी म्हणजेच 2022 च्या मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. मग लगेचच 5G साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसं तांत्रिकदृष्ठ्या पाहिलं तर ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आपण आग्रही असल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय.

Advertisement

अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकार यापुढेही सुधारणा करत राहील. येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात बदल होणार असून त्याचं नियमन जागतिक स्तरावरील मानकांनुसार असेल, त्यामुळे आम्ही त्यात अनेक सुधारणा करू अशी अपेक्षा व्यक्त केली. जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारतात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल, असे देखील ते म्हणाले.

5G नेटवर्कचा फायदा काय ?

Advertisement

भारत देशात स्पेक्ट्रम लिलावाच्या नंतर काही महिन्यात 5G सेवा सुरू होऊ शकते. पूर्वी 2G व 3G सेवा भारतामध्ये चालत होत्या. त्यानंतर 4G नेटवर्क आल्याने इंटरनेट स्पीडमध्ये बरीच वाढ झाली. डिजिटल दुनियेत रस निर्माण होऊन स्वस्त इंटरनेटही लगेच भेटू लागले. तसेच बाजारात आता आधीपेक्षा जास्त 5G SmartPhone ही विक्रीसाठी आले आहेत. वेगवान समजल्या जाणाऱ्या 5G च्या नेटवर्कवरून अल्ट्रा एचडी दर्जाचे व्हिडीओ कॉलिंगदेखील करता येते. तसेच स्मार्ट उपकरणांमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल. हे विद्यमान 4G LTE तंत्रज्ञानापेक्षा जलद गतीसाठी तयार केले गेले आहे. 4G स्पिडपेक्षा 5G ही नक्कीच जास्त स्पीड देणारी जलद इंटरनेट सेवा भविष्यात असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement