SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्ध थरारक विजय, भारताचा जावई ठरला पाक टीमसाठी व्हिलन..

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या (T20 World Cup) थरारक लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडविला… सुपर-12 च्या पाचही मॅच जिंकलेल्या पाकिस्तानचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले… विजेतेपदासाठी येत्या रविवारी (ता.१४) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून सुरुवातीला बॉलिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 10 ओव्हरमध्ये 71 धावा केल्या.

Advertisement

बाबर आझम 39 रन, तर मोहम्मद रिझवान 67 रनावर आऊट झाले. त्यानंतर फखर झमानने (32 बॉलमध्ये नाबाद 55, त्यात 3 फोर, 4 सिक्स) केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 177 धावांचे तगडे आव्हान दिले.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि एडम झम्पाला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Advertisement

मोठ्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. कधी नव्हे, ते डेव्हिड वॉर्नरला फाॅर्म गवसला. त्याने 30 बॉलमध्ये 49 रन केले. मात्र, त्यानंतरही शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 22 धावांची गरज होती.

भारताविरुद्ध दमदार कामगिरी केल्याने हवेत गेलेल्या पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीला मॅथ्यू वेडने सलग तीन गगनचुंबी षटकार ठोकत पाकिस्तानची हवाच काढून टाकली. एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य गाठलं.

Advertisement

मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 धावा केल्या. त्यात 4 सिक्सर, 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने 31 बॉलमध्ये 40 धावांची खेळी साकारताना मथ्यू वेडला चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शादाब खानला 4, तर शाहिन आफ्रिदीला 1 विकेट मिळाली.

भारताचा जावई ठरला व्हिलन
पाकिस्तानच्या पराभवात व्हिलन ठरला तो भारताचा जावई, म्हणजेच हसन अली. 19 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलला हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडला. नि त्यानंतर मॅथ्यू वेडने आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत मॅच जिंकवून दिली. हसन अली बॉलिंगमध्येही अपयशी ठरला. त्याने आपल्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 44 रन दिल्या.

Advertisement

हसन अलीची पत्नी शामिया आरजू भारतीय आहे. 2019 साली हसन आणि शामिया यांचे दुबईत लग्न झालं. शामिया हरियाणाची आहे. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातल्या चंदेनी गावची आहे. अमिरात एयरलाईन्समध्ये शामिया फ्लाईट इंजिनियर आहे. तिचं कुटुंब दिल्लीत राहतं.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement