SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोवॅक्सीनचा तिसरा डोस नाकाद्वारे दिला जाणार? कधी घ्यायचा बुस्टर डोस? कंपनी म्हणतेय…

कोरोना वर मात करण्यासाठी केंद्र सरकार देशभरात मोठ्या प्रमाणावर लशीकरण मोहीम राबवत कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी अभियान (Vaccination) राबविण्यात येत आहे. परंतु आता तिसरा बूस्टर डोस देखील आवश्यक आहे, असे भारत बायोटेकचे म्हणणे आहे.

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला (Dr. Krishna Ella) यांनी सांगितले की, अँटी-कोरोनाव्हायरस लसीचा तिसरा डोस हा दुसरा डोस घेतल्यावर सहा महिन्यांनंतर (Booster dose to be taken after six months of vaccination) घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ही सर्वात योग्य वेळ असल्याचं ते म्हणाले.

Advertisement

‘बूस्टर’ डोस म्हणून अनुनासिक लस?

कोरोना प्रतिबंधक लसीचा भारत बायोटेककडून देखील ‘बूस्टर’ डोस म्हणून अनुनासिक लस (नाकाद्वारे) म्हणजेच नाकावाटे घेण्याचा डोस (Nasal Dose) तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली. कोवॅक्सीनचा (Covaxin) तिसरा डोस नाकाने दिला जाऊ शकतो की नाही हे आम्ही शोधत आहोत, हे वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहे कारण सदर डोस नाकातून दिला तर संसर्ग पसरण्यापासून रोखू शकता.

Advertisement

इंजेक्शनमार्फत घेतल्या जाणाऱ्या डोसच्या तुलनेत हा डोस अत्यंत प्रभावी असून कोरोना विषाणूवर तो जास्त परिणामकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जगभरात सध्या इम्यूनोलॉजीवर प्रयोग व संशोधन सध्या सुरू असून नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा परिणाम जास्त असल्याचं दिसून येतंय. पण भारत बायोटेककडून सर्वात अगोदर हा नेजल डोस तयार करण्यात आला असून त्याची पहिल्या टप्प्याची चाचणीदेखील यशस्वी पार पडल्याचं त्यांनी सांगितलं.

झिकाविरोधी लसीबाबत डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले की..

Advertisement

भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनी ‘झिका’ ही झिका विषाणूविरोधी लस बनवणारी जगातील पहिली कंपनी असून त्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही ते म्हणाले. चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला, तरी प्रकरणे अधिक असल्याने लवकरात लवकर सरकारला जास्त चाचण्या कराव्या लागतील.

2014 साली आम्ही झिका विषाणूविरोधी लस बनवणारी जगातील पहिली कंपनी होतो. झिकाविरोधी लशीसाठी जागतिक पेटंटसाठी अर्ज करणारी आमची कंपनी व आम्ही पहिलेच होतो. कोरोनावरील नेजल व्हॅक्सिन आणि झिकावरील व्हॅक्सिन ही दोन महत्त्वाकांक्षी उत्पादनं लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement