SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमृता फडणवीस यांची नवाब मलिक यांना नोटीस, ’48 तासांत ‘ते’ ट्विट डिलीट करा, नाहीतर…’

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी (NCB), समीर वानखेडे व त्यानंतर भाजपवर आरोपांचा राळ उठवून दिली होती.

मलिक त्यावरच थांबले नाहीत, तर थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचेच ‘ड्रग पेडलर’सोबत संबंध असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यात मलिक विरुद्ध फडणवीस फॅमिलीमध्ये जोरदार सामना रंगला आहे.

Advertisement

नवाब मलिक यांचा आरोप
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी काही वर्षांपूर्वी एक गाणं प्रसिद्ध केलं होतं. त्यासाठीचा ‘फायनान्स हेड’ ड्रग्ज पेडलर जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस व राणा यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

Advertisement

अब्रु नुकसानीची नोटीस
नवाब मलिक यांच्या या आरोपांवरुन अमृता फडणवीस यांनी मलिक यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवलीय. ‘पुढील 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ‘ट्विट’ डिलिट करा नि सार्वजनिकरित्या माफी मागा, अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा..’ सोबत फौजदारी कारवाईचाही इशारा दिलाय.

ट्विटद्वारे मलिक यांनी गैरसमज पसरवून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित प्रकरणात मलिक यांनी कायदेशीर उत्तर न दिल्यास अब्रु नूकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा अमृता फडणवीस यांनी नोटीशीद्वारे दिला आहे.

Advertisement

‘बेनामी व काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करीत असल्याची टीकाही अमृता फडणवीस यांनी केली आहे.

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांनाही निलोफर यांची नोटीस
दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान व जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करताना निलोफर यांनी फडणवीस यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement