SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास घरबसल्या पुन्हा मिळेल; अशी आहे सोपी प्रोसेस..

वाहन चालविण्याचा परवाना.. अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स. रस्त्यावर वाहन चालविल्यासाठीचा अधिकृत परवाना. हा परवाना नसल्यास चालक अडचणीत येऊ शकताे. दंडात्मक कारवाई तर होतेच, कधी कधी वाहनही जप्त केले जाऊ शकते..

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (Driving License)बाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. बऱ्याचदा पॉकेट चोरी होते वा हरवले, तर त्याबरोबर ‘लायसन्स’लाही मुकावे लागते. तसे झाल्यास बर्‍याच वेळा वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

Advertisement

मात्र, आता वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ हरवले वा चोरी झाले, तरी ‘नो टेन्शन’.. कारण अगदी घरबसल्या तुम्ही ‘डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स’ काढू शकता.

लायसन्स हरवल्यास सर्वात आधी पोलिस ठाण्यात ‘एफआयआर’ (FIR) नोंदवावा. कारण, ‘डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स’ काढण्यासाठी या ‘एफआयआर’ची कॉपी लागते. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ अतिशय जूनं झालं असेल, फाटलं असेल, तर ओरिजनल लायसन्सची कॉपी द्यावी लागेल.

Advertisement

असं काढा घरबसल्या लायसन्स..!
– सर्वात आधी रस्ते वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– वेबसाइटवर सर्व डिटेल्स भरल्यानंतर ‘एलएलडी’ (LLD) फॉर्म भरा.
– फॉर्मची प्रिंट आउट काढा. त्यानंतर सर्व आवश्यक डॉक्युमेंट अटॅच करा.
– हा फॉर्म आरटीओ (RTO) ऑफिसमध्ये जमा करा. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांत ‘डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स’ घरपोहोच मिळेल.

ऑफलाईन अर्ज कसा करणार..?
सर्वात आधी ‘आरटीओ’ ऑफिसमध्ये जा. तेथे आवश्यक ‘डॉक्युमेंट’ सबमिट करा. तेथे ‘एलएलडी’ फॉर्म भरल्यानंतर फी भरावी लागेल. या प्रोसेसमध्ये 30 दिवसांनंतर ‘डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स’ मिळेल.

Advertisement

डुप्लिकेट लायसन्ससाठी फी भरल्यानंतर एक रिसीट मिळेल. ही रिसीट सांभाळून ठेवावी. ‘डुप्लीकेट लायसन्स’ मिळेल, त्यावेळी रिसीटची गरज लागेल. या ‘रिसीट’द्वारे ‘डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स ट्रॅक करता येऊ शकतं.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement