SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा..!

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन याबाबतची घोषणा केली. त्यानुसार, उद्यापासूनच (ता. 12 नोव्हेंबर) बारावी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.

Advertisement

बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, ‘आयटीआय’ घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.

Advertisement

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांमधील नियमित विद्यार्थ्यांना सरल (SARAL) डाटा बेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत आवेदनपत्रे भरता येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणारे विद्यार्थी, ‘आयटीआय’द्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थ्यांना 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज भरायचे आहेत.

Advertisement

विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांच्या माहितीनुसार, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री-लिस्ट 28 डिसेंबर 2021 रोजी जमा करावी लागणार आहे..

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement