SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कंगणा राणावतचे वादग्रस्त वक्तव्य.. म्हणाली, ‘देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले…’

वादग्रस्त वक्तव्ये करुन कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारी अभिनेत्री कंगणा राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगणाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरुन आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे..

कंगनाला नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल तिने एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Advertisement

कंगणा काय म्हणाली..?
मुलाखतीत कंगणा म्हणाली, की ‘रक्त वाहणारंच होतं, पण ते भारतीयांचं वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले, ती भीक होती.. देशाला खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं..!”

त्यावर मुलाखतकार कंगनाला ‘म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात..’ असे म्हणतात, असे म्हटली. त्यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. नंतर कंगणा म्हणाली, की आता यानंतर माझ्याविरुद्ध आणखी १० गुन्हे दाखल होतील..’

Advertisement

मुलाखतकार म्हणते, की आता तर तू दिल्लीत आहेस.. त्यावर कंगणा म्हणते, की जायचं तर घरीच आहे.. दरम्यान कंगणाच्या या वक्तव्यावरुन तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

पंतप्रधानांना ‘सुपरस्टार’ मानते
दरम्यान, कंगनाने ती कोणाला सुपरस्टार मानते, हे देखील सांगितले. ती म्हणाली, की ”मी ज्या कुटुंबातून आले, त्यात पंतप्रधानांना ‘सुपरस्टार’ मानले जाते. पंतप्रधान माझ्या कुटुंबासाठी सुपरस्टार आहेत नि नेहमीच असतील.”

Advertisement

पुढे ती म्हणाली, की ”पीएम मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, यात शंकाच नाही. ते आपल्या देशासाठी आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे. मला वाटते की, त्यांनी आपल्या देशाला अशा ठिकाणी नेले आहे, जिथे उभे राहण्याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो…”

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement