जगात प्रत्येक मूल जन्म घेतं तेव्हा त्याला विशिष्ट नावाने हाक मारता यावी, त्याची भविष्यात एक वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून नाव ठेवत असतात. एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर खूप प्रभाव असतो. याच नावाने मुलांना गल्लीत, कॉलनीत, गावात-शहरात, शाळेत-कामाच्या ठिकाणी ओळखलं जातं. बहुतेक लोक त्यांच्या जन्म राशीनुसार नावे ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला त्या व्यक्तीची खास गोष्टींची माहिती मिळू शकते.
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे कळू शकेल का? त्याच्या आवडी-निवडी काय आहेत? त्याची कारकीर्द कशी असेल? इथे तुम्हाला अशाच काही अक्षरांबद्दल माहिती देणार आहोत, या अक्षरांनी ज्यांचे नाव सुरू होते ते लोक खूप भाग्यवान मानले जातात.
‘A’ अक्षर: आपल्या सभोवताली बऱ्याच लोकांचं नाव हे A अक्षराने सुरू होतं. जसे की, अक्षय, अश्विनी, अनिता, अभिजित, अजय, अभिषेक, अमर, अनंत, अभय, अनुसया, अमृत, अमृता इ. नावाचे व्यक्ती खूप मेहनती आणि धैर्यवान मानले जातात. त्यांचे नशीब खूप बलवत्तर असतं. आपलं म्हणणं स्पष्टपणे पटवून देण्यात ते तरबेज असतात. ते त्यांच्या उद्योगधंद्याबद्दल सिरीयस विचार करणारे असतात. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाला वाखाणण्यात येतं. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळतं.
‘K’ अक्षर: ज्या लोकांचं नाव K अक्षराने सुरू होतं, त्यांचे नशीब खूपच भारी असतं. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात ते यश मिळवतात. या लोकांना समाजसेवेत फार रस असतो. ते मुक्त विचारांचे असतात. ते आयुष्यात भरपूर पैसे कमावतात. या नावाच्या व्यक्ती घरातील लोकांसाठी जीव की प्राण असतात. वडिलोपार्जित घर, प्लॉट आणि जमीन मिळण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी कोणाच्या अचानक भेटीने या व्यक्ती रहस्य उलगडत असतात.
‘M’ अक्षर: ज्या लोकांचं नाव M अक्षराने (जसे की, मनीषा, मनीष, मनोज) सुरू होतं ते देखील खूप भाग्यवान मानले जातात. त्यांना त्यांचे आयुष्य स्वतःच्या मनानुसार जगायला आवडते. या लोकांना थोडे कष्ट करून प्रचंड यश मिळतं. ते त्यांच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आणि गंभीर असतात. त्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत असतं. या व्यक्तींना खेळात प्रचंड यश मिळतं. काळजीवाहू असतात.
‘T’ अक्षर: ज्या लोकांचं नाव T अक्षराने (जसे की, तनुजा, तन्मय, तनया) सुरू होतं ते खूप जिद्दी आणि हट्टी असतात, त्यांना एकदा डोक्यात आलेली गोष्ट करण्यामागेच जास्त वेळ खर्च करावी वाटते. एकदा ठरवलेल्या कामात यश मिळवण्यासाठी ते सर्व प्रयत्न करतात. ते कोणतेही काम विचारपूर्वक करतात पण कधीकधी त्यांचा समतोल बिघडतो म्हणून ते शांत डोकं ठेवून निर्णय घेत असतात. त्यांना विनोद करायला आणि टोमणेबाजीत अतिशय चतुर असतात. कोणीही त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतो.
‘P’ अक्षर: ज्यांचं नाव P अक्षराने (जसे की पवन, पलक,पलाशा) सुरू होतं त्यांची बुद्धी कुशाग्र मानली जाते. या नावाच्या व्यक्तीमध्ये प्रेम जास्त असते आणि नकारात्मक दृष्ट्या सांगायचं झालं तर यातील काही व्यक्तींना कष्ट न घेता पुढे जायचं असतं, मग अशा काही व्यक्ती लबाड बोलल्याकचं आपल्याला जाणवतं. ते त्यांचे काम अतिशय हुशारीने करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत जिंकायला आवडतं. त्यांची ही सवय त्यांना यशही मिळवून देते. त्यांच्याकडे पैशाची बिलकुल कमी नसते. कामाच्या ठिकाणी त्यांची वेगळी ओळख होत असते. यश हे त्यांना मोठं भेटतं.
(नोंद घ्या: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. लक्षात असुद्या की, लेखातील शक्यतांची ‘स्प्रेडइट’ कोणतीही जबाबदारी घेत नाही.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511