SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : विनाकारण आक्रमकता दाखवू नका. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. संतती चिंता, पोटासंबंधी विकार त्रास देतील. प्रकृतीची काळजी घ्या.

Advertisement

वृषभ (Taurus) : दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. पैसा टिकणार नाही.

मिथुन (Gemini): विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. आळस दूर सारावा. कार्यक्षेत्रात नेहमीपेक्षा अधिक काम पडेल.

Advertisement

कर्क (Cancer): तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. मेहनत फळाला येईल. स्वभाव जरा रागीट होण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo) : हातातील अधिकार ठामपणे बजावा. भाग्याची चांगली साथ मिळेल.त्वचा रोग व अ‍ॅलर्जीसंबंधी विकार डोकं वर काढतील. म्हाताऱ्या व्यक्तींनी जपून राहावं.

Advertisement

कन्या (Virgo): बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मातृ चिंता सतावू शकते. नवीन वास्तुसंबंधी निर्णय होईल.

तूळ (Libra) : बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील. ऑफिसमध्ये जास्तीचे काम पडेल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. वाहन दुरुस्ती किंवा खरेदी होईल. आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल.

धनु (Sagittarius) : प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. संभाषण चातुर्य कमालीचं वाढेल. वकील, कलाकार यांना दिवस उत्तम.

Advertisement

मकर (Capricorn) : घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. कटू शब्द, वाद टाळा. पराक्रम व चिकाटी वाढवेल. क्रोध निर्माण होईल.

कुंभ (Aquarius) : तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी. शुभ कार्य घडतील. काहींना भावंडाची चिंता सतावू शकते.

Advertisement

मीन (Pisces) : दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल आर्थिक स्थिती चांगली राहील.

Advertisement