कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सर्व परीक्षा स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. त्यात ‘एमपीएससी’ (MPSC) परीक्षाही रद्द करण्यात आली. त्यावरुन मोठा गदारोळ उडाला. कोरोना संकटात पुण्यातील ‘एमपीएससी’च्या परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. खासदार संभाजी छत्रपती यांनीही विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविली होती.
अखेर ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘एमपीएससी’ परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आता एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आलीय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांना सुरळीतपणे परीक्षा देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.
एमपीएससी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी शेवटची मुदत होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यास करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे.
वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर एक वर्ष मुदतवाढ देण्याच्या निर्णयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडली असणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511