पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! आता घरबसल्या व्हिडीओ कॉलद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार, कसं ते वाचा..
भारतातील स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1 नोव्हेंबर 2021 पासून देशातील पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करतेय. त्या अंतर्गत पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
एसबीयने या नवीन सुविधेचे नाव ‘Video Life Certificate Service’ असं ठेवलंय. SBI ने सांगितले की, व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवा ही अत्यंत सोपी, सुरक्षित, पेपरलेस आणि मोफत डिजिटल सुविधा आहे. यामध्ये पेन्शनधारकांना त्यांचा फक्त नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड लागणार आहे.
जाणून घ्या प्रक्रिया स्टेप बाय स्टेप:
▪️ सर्वप्रथम निवृत्त वेतनधारकांना https://www.pensionseva.sbi/ वर जावं लागेल.
▪️ मग ड्रॉप डाऊनमधून Video LC वर क्लिक करा. आता एसबीआय बँकेतील पेन्शन खाते क्रमांक लिहा आणि कॅप्चा कोड टाका.
▪️ पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो तिथे भरा.
▪️ आता सर्व नियम आणि अटी लक्षपूर्वक वाचा आणि नंतर ‘Start Journey’ (स्टार्ट जर्नी) वर क्लिक करा.
▪️ मग व्हिडीओ कॉलदरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर, ‘I am Ready’ वर क्लिक करा.
▪️ यानंतर व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनसंबंधी परवानगी द्या.
▪️ एसबीआय बँकेत अधिकार्याच्या उपलब्धतेनुसार तुमचा व्हिडिओ कॉल सुरू होईल मग आपल्या सोयीनुसार वेळेची निवड करून व्हिडीओ कॉल करू शकता.
▪️ व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर बँक अधिकारी पेन्शनधारकाला स्क्रीनवर दिसत असलेले पडताळणी कोड वाचायला सांगेल. हे बँक अधिकाऱ्याला सांगा.
▪️ व्हिडीओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. ज्याचा अधिकारी फोटो घेऊ शकेल. यानंतर तुमचा सुद्धा एक फोटो घेतला जाईल आणि प्रक्रिया पूर्ण होईल.
जर ही प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर पेन्शनधारकाला बँकेच्या शाखेत जाऊन जीवन प्रमाणत्र द्यावे लागेल. जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे.
(ही बातमी प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत नक्की पोहोचवा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511