टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने नामिबीयाविरुद्धचा अखेरचा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड केला खरा, पण आता यानंतर विराट कोहली कदाचित पुन्हा टी-20 संघाचा कर्णधार म्हणून दिसणार नाही. विराटसाठी कॅप्टन म्हणून हा अखेरचा सामना ठरला..
विराटनंतर कोण, असा प्रश्न जगभरातील क्रिकेट रसिकांना पडला आहे. अनेक क्रिकेट पंडितांनी वेगवेगळ्या खेळाडूंची नावे सांगितली आहेत. रोहित शर्मा, के. एल. राहुल, ऋषभ पंत यांची नावे समोर येत असली, तरी ‘बीसीसीआय’ने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
दरम्यान, टी-२० विश्वचषकात शेवटच्या सामन्याच्या वेळी मात्र विराटने इशाऱ्यांतच पुढील कर्णधाराचे नाव स्पष्ट केलं.
कॅप्टन म्हणून शेवटच्या सामन्यात टाॅस जिंकल्यावर तो म्हणाला, की “टीम इंडियाचे नेतृत्व, ही सन्मानाची बाब आहे. मी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण आता दुसऱ्यांना संधी देण्याची वेळ आलीय…!”.
विराट म्हणाला, की ‘टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखविला, त्याचा मला गर्व आहे, पण आता पुढे जाण्याची वेळ आलीय.. रोहित बराच काळ संघात असून, त्याने सर्व काही जवळून पाहिलं आहे…’ विराटच्या वाक्यातच पुढील कर्णधार कोण असेल, हे स्पष्ट झाले..
टाॅस जिंकूनही निराश
पाकिस्तान व न्युझीलंड सामन्यात टाॅस हरल्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. मात्र, कर्णधार म्हणून खेळताना शेवटच्या सामन्यात विराटने टॉस जिंकला. मात्र, टाॅस जिंकूनही त्याला फार आनंद झाला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे दु:ख स्पष्ट दिसत होते.
तो म्हणाला, की “टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टॉसने निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या दोन सामन्यात टॉस जिंकायला हवा होता..”
सध्या रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. विराटनंतर कर्णधारपदासाठी तोच प्रबळ दावेदार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळेल. याबाबतची घोषणा बीसीसीआय लवकरच करणार असल्याचे समजते..
कोहली-शास्री युगाचा अंत
विराटसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही कार्यकाळ या स्पर्धेबरोबर संपला. टीम इंडियासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शास्त्री गुरुजींनीही समाधान व्यक्त केलं. कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्यांनी टीम इंडियाचे कौतुक केलं.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511