SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 09 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : सध्या शांत राहून वेळ घालवा. तुम्हाला मनाला वाटेल ते करावं वाटेल पण रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सक्रिय सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini): जोडीदाराच्या मताचा विचार करा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा.

Advertisement

कर्क (Cancer): आळसात दिवस ढकलू नका. नवीन ओळखीचा लाभ होईल. भावनिक विचार करू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा.

सिंह (Leo) : डोके शांत ठेवून काम करावे. आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल.

Advertisement

कन्या (Virgo): मित्रांशी मुलाखात होईल. नेटाने व्यायाम करावा. मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. बाहेर खाऊ वाटेल.

तूळ (Libra) : माणसे ओळखायला शिकावे. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडू नका एवढी दक्षता घ्या.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी करावा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

धनु (Sagittarius) : आहारावर नियंत्रण ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. फिरण्यास मनाई होईल.

Advertisement

मकर (Capricorn) : घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. आपला दिवस आनंदात जाईल.

कुंभ (Aquarius) : आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मार्गदर्शक व्यक्तींच्या भेटीचा योग.

Advertisement

मीन (Pisces) : कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. सर्व गोष्टींची खातरजमा करावी. कुटुंबात अधिकार प्राप्त होईल. अधिकार गाजवण्यात पटाईत व्हाल.

 

Advertisement