SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाचा दुबळ्या नामिबियावर विजय, टी-20 वर्ल्ड कप मोहीम थांबली..

टी-20 विश्वचषकातील आव्हान आधीच संपलेल्या टीम इंडियाने आपल्या अखेरच्या लढतीत दुबळ्या नामिबिया संघाचा 9 विकेट आणि 28 चेंडू राखून पराभव केला. कर्णधार म्हणून विराटचा हा अखेरचा टी-20 सामना होता.

पाकिस्तान व न्युझीलंड यांच्याविरोधातील सामने हरल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. अन्य संघाच्या जय-पराजयावर भारताची वाटचाल अवलंबून होती.. मात्र, तसा कोणताही करिश्मा झाला नाही.

Advertisement

न्युझीलंडने अफगाणीस्तानचा पराभव केल्यानंतरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपले होते. नेट रनरेटच्या जोरावर सेमी फायनलमध्ये जाण्याचा कसून प्रयत्न केला. मात्र, त्याचाही काही फायदा झाला नाही.

नामिबिया विरुद्धच्या लढतीला औपचारिकता सोडली, तर काहीही महत्त्व नव्हते, पण हा अखेरचा सुपर 12 सामन्यालाही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. विराट कोहलीने कॅप्टन म्हणून अखेरच्या सामन्यात टाॅक जिंकला नि फिल्डिंगचा निर्णय घेतला..

Advertisement

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 6 फलंदाज बाद करीत नामिबियाला 134 धावांवरच रोखले. रविचंद्रन अश्विनने 20 धावांत 3, तर अष्टपैलू रवींद्र जाडेजाने 16 धावांत 3 फलंदाज बाद करीत नामिबियाच्या धावांना वेसण घातली.

‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहने 19 धावांत 2 विकेट मिळवल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीवीर राहुल चहरला मात्र एकही विकेट घेता आली नाही.

Advertisement

नामिबियाने दिलेले आव्हान टीम इंडियाने फक्त एक विकेट गमावून 15.2 षटकांत पार केले. त्यात सलामीवीरांची फटक्याची आतिषबाजी पाहायला मिळाली.

रोहित शर्मा (37 चेंडूंत 56) आणि के. एल. राहुल (36 चेंडूंत नाबाद 54) यांनी 59 चेंडूंत 86 धावांची तुफानी सलामी दिली. रोहितने 7 चौकार व 2 षटकार, तर राहुलने 4 चौकार आणि 2 षटकारांची बरसात केली. पूर्ण सामन्यात भारताने 15 चौकार आणि 4 षटकारांचा पाऊस पाडला.

Advertisement

रोहित अर्धशतक करुन तंबूत परतल्यावर सूर्यकुमार यादव (नाबाद 25 ) याने राहुलच्या साथीने टीम इंडियाचा मोठा विजय साकारला. सूर्यकुमारने आपल्या खेळीत 4 चौकार फटकावले. या विजयासह टीम इंडियाची यंदाची टी-२० वर्ल्ड कप मोहीम इथेच थांबली..

विराट कोहलीसाठी कॅप्टन म्हणून अखेरचा सामना होता. तसेच कोच म्हणूनही रवी शास्री यांचा प्रवास येथेच संपला. शिवाय सहायक स्टाफही आता बदलणार आहे. त्यामुळे न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाला नवीन कॅप्टन, कोच नि सहायक स्टाफ मिळणार आहे..

Advertisement

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement