SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ जन्मतारीख असलेले लोक असतात नशीबवान; जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक रंजक गोष्टी..

आपल्याकडे बरेच लोक त्यांना काही अपत्य झाल्यानंतर त्याची जन्मकुंडली तर काढतच असतो. आपल्यालाही आपली रास, रास नाव त्यातूनच कळतं. यापलीकडेही असतं ते अंकशास्त्र. यामध्ये कोणता अंक आपलं भाग्य उजळवतो किंवा कोणत्या तारखेला ठराविक काम केलेले चांगले असेल असं बरंच काही समजतं. जशी की तुमची जन्मतारीख..

तर आपण कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तारखेपासून खूप काही माहीत करून घेऊ शकता. एखाद्या वर्षाच्या कोणत्याही एक महिन्याच्या तारखेला आपला जन्म झालेला असतो. हे आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून माहीत झालेलं असतं. त्यानुसार अंकशास्त्रानुसार (Numerology) समजा 6, 15 किंवा 24 तारखेला एखाद्या व्यक्तीचा जन्म (Date of birth) झालेला असेल, तर त्या व्यक्तीचा मूलांक 6 मानला जातो. या संख्येचा शासक ग्रह शुक्र असा आहे.

Advertisement

मुलांक 6 असणाऱ्या व्यक्तींबद्दल अधिक रंजक माहीती..

▪️ या राशीच्या लोकांवर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते असं मानतात.
▪️ त्यांच्याकडे पैशाची आणि अन्नाची कमी कधी भासत नसते. या व्यक्ती खूप चतुर आणि बुद्धिमान असतात.
▪️ इतरांच्या मनातील गुपित त्यांना लगेच कळतं.
▪️ मूलांक 6 असलेले लोकं श्रीमंत व सुंदर असतात. ते सौंदर्याकडेही लवकर आकर्षित होतात.
▪️ या राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.
ते नेहमी राजे-महाराजांसारखे आयुष्य जगतात. त्यांच्याकडे पैसा, मालमत्ता चांगली असते. एकत्र राहायला आवडते.
▪️ फक्त पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.
ते नेहमी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात.
▪️ या मूल्यांकाची लोकं खूप विश्वसनिय व शांतताप्रिय असतात.
▪️ सभोवतालच्या लोकांनाही आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
▪️ त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आहे. या लोकांना संगीत आणि चित्रकलेची चांगली आवड आहे.
▪️मालमत्तेच्या बाबतीत त्यांना काही न्यायालयीन खटल्यांनाही सामोरे जावे लागते.
▪️ दागिने किंवा कापडाच्या व्यवसायात किंवा इतर संबंधित कामांमध्ये चांगले काम करू शकतात. चित्रपट, नाटक, सोने-चांदी, हिरे इत्यादींशी संबंधित कामेही त्यांच्यासाठी शुभ असतात.
▪️ त्यांचे वैवाहिक जीवन सामान्यतः आनंदी असते. नातेसंबंध बांधण्यात खूप घाई करतात. त्यामुळे त्यांना नंतर अनेकदा पश्चाताप करावा लागतो.

Advertisement

(नोंद घ्या: सदर लेख हा प्राथमिक माहितीवर आधारित आहे, तरी आपण एकदा खात्री करून घ्यावी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement