SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुजरातमध्ये जाऊन गाडीची टाकी होतेय फुल्ल! पेट्रोल गुजरातमध्ये जास्त स्वस्त?

देशात पेट्रोल- डिझेलच्या किंमती रोजच बदलत असतात. राज्‍यात हे दर अधिक असून, पेट्रोलच्‍या दरात अंदाजे आठ रूपयांची तफावत असल्‍याने वाहन धारक महाराष्‍ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्‍ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यानंतर लगेचच गुजरात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर सात-सात रुपये प्रति लीटर कमी केल्याने महाराष्ट्र राज्यापेक्षा गुजरात राज्यात पेट्रोल 14 रुपयांनी स्वस्त झाले तर डिझेल 4 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Advertisement

गुजरातमध्ये जाऊन टाकी होतेय फुल्ल!

राज्य बदलले की प्रत्येक राज्याची कर आकारणीही बदलते. याचा परिणाम असा झाला ली, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून अवघ्या 2 किलोमीटरवर असलेल्या गुजरातमध्ये होत आहे. तर गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे अनेक वाहन चालक गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर टाकी फुल करतात.

Advertisement

महाराष्ट्रात पेट्रोलवर वॅट दर गुजरात राज्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नवापूर, तळोदा, अक्कलकुआ, नंदुरबार येथील वाहनचालक गुजरातमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल पंप कमी चालत असल्याचं दिसून येत आहे तर व्यवसाय चार पटीने कमी झाला आहे.

गुजरात राज्यामध्ये पेट्रोल 14 रूपये आणि डिझेल 4 स्वस्त असल्याने 24 तासात 5 हजार पेट्रोलची विक्री होते. केंद्र व राज्य सरकारने दर कमी केल्याने पेट्रोल पंपावर महाराष्ट्र पेक्षा चार रुपयाने डिझेल स्वस्त मिळत असल्याचं, तेथील एका पेट्रोलपंप मालकाने सांगितलं. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. 5 नोव्हेंबरनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कामध्ये घट केल्यानंतर अनेक राज्यांनीदेखील पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये घट केली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement