SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला माहीती हवं! एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डचं काय करायचं?

देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हे गरजेचे आहे. तसेच PAN Card ही महत्वाचे आहे. Aadhaar Card प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचं आहे. या दोन्ही कागदपत्रांविना अनेक काम रखडली जातात. व्यक्ती सध्या असताना याची गरज असते. पण कधी तुम्हाला असं वाटलं का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? चला पाहू..

मृत्यूनंतर आधार कार्डचं काय कराल?

Advertisement

एखाद्या व्यक्तीच्या अर्थातच भारतीय नागरिकाचं आधार कार्ड ओळखपत्र ॲड्रेस प्रुफ असून अत्यावश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. या आधार कार्डवर एक युनिक नंबर असतो, त्यामुळे मृत्यूनंतरही हा नंबर कायम राहतो. होय. कारण हा नंबर कायमस्वरूपी वापरासाठी दिला गेलेला असतो. हा नंबर इतर दुसरं कोणालाही देत येत नाही. मृत्यूनंतर नंबर डिॲक्टिवेट करता येत नाही.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅन कार्डचं काय करणार?

Advertisement

पॅन कार्ड तुमचा टॅक्स वाचवतं. बँकेत अकाऊंट असल्यास, डिमॅट अकाऊंट आणि इनकम टॅक्स रिटर्नसाठी पॅन कार्ड सर्वात आवश्यक आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पॅन कार्डचे अधिकार असतात आणि मृत व्यक्तीचे चार वर्षानंतर असेसमेंट पुन्हा ओपन करायचं की नाही हे अधिकारही त्यांच्याकडेच असतात.

जर समजा मृत व्यक्तीचे टॅक्स रिफंड बाकी असल्यास ते रिफंड खात्यात आलं की नाही हे तपासणं आवश्यक असतं. यासंबंधी कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास, मृत व्यक्तीचं पॅन कार्ड आयकर विभागाकडे सोपवता येऊ शकतं. पॅनकार्ड बंद करण्यापूर्वी संबंधित मृत व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत की नाही, याची दक्षता करून घेतली पाहिजे.

Advertisement

PAN Card सरेंडर कसं करायचं?

आता गोष्ट येते ती पॅन कार्ड सरेंडर करण्याची! समजा मृत व्यक्तीच्या प्रतिनिधीला/कुटुंबातील व्यक्तीला किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला अशा असेसिंग ऑफिसरला (assessing officer) एक अर्ज द्यावा लागेल, ज्याच्या अधिकार क्षेत्रात (विभागात) पॅन कार्ड रजिस्टर्ड आहे. या अर्जामध्ये पॅन कार्ड सरेंडर करण्याचं नेमकं कारण (कागदोपत्री असल्यास उत्तम), त्याचे नाव, पॅन नंबर, जन्मतिथी (Date of Birth) आणि मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) यांची कॉपी जोडावी लागणार आहे.

Advertisement

मृत व्यक्तीचं पॅन कार्ड सरेंडर करणं अनिवार्य नाही. कारण जर भविष्यात कधी या पॅन कार्डची तुम्हाला गरज लागलीझ तर ते तुमच्याकडेही तुम्ही ठेवू शकता. पॅन कार्ड सरेंडर करण्याच्या आधी त्या मृत व्यक्तीचे सर्व बँक अकाउंट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करणं किंवा बँक अकाऊंट बंद करणं आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement