अफगाणिस्तानवर न्यूझीलंडच्या विजयासह, टी -20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारे संघ निश्चित झाले ज्यामध्ये भारताचा समावेश होणार नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यां देशाच्या क्रिकेट टीमने उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या जिंकण्यावर भारताचं उपांत्य फेरीत पोहोचण्याचं समीकरण अवलंबून होतं.
या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup 2021) पहिल्या सामन्यातच भारतीय संघ पाकिस्तानकडून 10 विकेट्सने हरला होता. म्हणून भारताला पुन्हा स्पर्धेत कमबॅक करणं कठीण झालं होतं. त्यात न्यूझीलंडनेही टीम इंडियाला 8 गडी राखून पराभूत केले. हे दोन पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरले.
भारताकडून कोणत्या चुका झाल्या?
▪️ हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा समतोल बिघडला. त्याला फक्त बॅट्समन म्हणून ठेवण्यात आलं होतं. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला एकही विकेट घेता आली नाही आणि पाकिस्तानविरुद्ध विकेट्स लवकर गेल्या.
▪️ रोहित शर्माच्या अनुभवाचा योग्य वेळी फायदा घेता आला नाही. कायमस्वरूपी त्याला सलामीला पाठवायला हवं, असं सोशल मीडियात वादळ उठलं. जे काही दिवसांपासून योग्यच मानलं जात होतं.
▪️ गोलंदाजांची चुकीची निवड: टीम इंडिया एकेकाळी युझवेंद्र चहल, कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंसोबत मैदानात यायची. निम्मा संघ हे दोघे मिळून गारद करण्याची क्षमता त्यांच्यात असताना या संपूर्ण स्पर्धेत भारताने रिस्ट स्पिनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवलेच नाही.
▪️ नाणेफेक: सुरुवातीला दोन सामन्यांमध्ये विजय आवश्यक असताना भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने नाणेफेक गमावली आणि रात्री पडणाऱ्या दवामुळे पाकिस्तानने 152 धावांचे लक्ष्य सहज गाठले व न्यूझीलंडनेही 111 धावा आरामात केल्या.
▪️ बायो-बबल (Bio-Bubble): भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज खेळल्यावर लगेचच यूएईला (UAE) पोहोचले आणि IPL 2021 खेळायला लगेच सुरुवात केली. यादरम्यान विश्रांती करायचं राहूनच गेलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रात्री मोहम्मद शमीनेही याबाबत उद्गार व्यक्त केले होते की, बायो-बबल थकवा आणि जास्त क्रिकेट खेळाडूंना कठिण ठरले आहे. आयपीएल 2021 नंतर लगेचच टी20 विश्वचषक 2021 सुरू झाला आणि त्याचा उल्लेख स्वतः कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने केलेला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, सध्याच्या T-20 वर्ल्डकपमधील सुपर-12 चे आठ संघ पुढील वेळेस T-20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. दरम्यान शनिवारी वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 मध्ये थेट पात्रता आठ संघ निश्चित झाले आहेत. या आठ संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511