कोरोनाच्या संकटात काळात सरकारी कर्मचाऱ्यांना काही सवलती देण्यात आल्या तर काही सुविधा आणि शिथीलता देण्यात आल्या होत्या, त्या आता रद्द करण्यात येत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ हजेरी नोंदवावी लागणार आहे.
हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक्स प्रणाली आज सोमवारपासून (ता. 8 नोव्हेंबर) पुन्हा लागू करण्यात येत आहे. बायोमेट्रिक्स प्रणालीबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया यांनी म्हटलं होतं की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि कामाचे तास कमी करणे अशा अनेक सवलती आधीच रद्द करण्यात आल्या होत्या. आता 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे.
केंद्र सरकारने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे केली जारी
▪️ सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बायोमेट्रिक मशीनच्या जवळच सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असेल.
▪️ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यापूर्वी व नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे लागतील.
▪️ बायोमेट्रिक हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांना त्यांच्यामध्ये कमीत कमी 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे.
▪️ सर्व कर्मचाऱ्यांनी नेहमी मास्क लावणे आवश्यक आहे.
▪️ बायोमेट्रिक मशीनचे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी नियुक्त कर्मचारी तैनात करायला हवेत. हे कर्मचारी हजेरी नोंदवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वे सांगतील.
▪️ मोकळ्या, हवेशीर वातावरणात बायोमेट्रिक मशीन ठेवणं गरजेचं, जर मशीन आत असेल तर तेथे पुरेसे नैसर्गिक वायुवीजन असावे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात डीए आता 31 टक्के झाला आहे. वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511