SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फेसबुकवर चोरीचा आरोप.. कायदेशीर कारवाईची टांगती तलवार.. नेमकं काय घडलं..?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’ (Facebook) कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपले नाव बदलून ‘मेटा’ (Meta) केले होते. कंपनीच्या रि-ब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल केल्याचे ‘फेसबूक’कडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या नामांतरणावरुनच ‘फेसबूक’ आता अडचणीत आली आहे..

शिकागो येथील ‘टेक फर्म’ यांनी म्हटलेय की त्यांच्या कंपनीचे नाव ‘मेटा’ असून, ‘फेसबूक’ने हे नाव चोरलंय. फेसबुक कंपनीकडून त्यांची ‘मेटा’ कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात अपयश आल्याने फेसबुककडून ‘मेटा’ हे नाव चोरण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

‘मेटा’ नाव चोरल्याचे आरोप
मेटा कंपनीचे संस्थापक नेट स्कुलिक (Nate Skulic) म्हणाले, की फेसबुकने केवळ त्यांचे नावच चोरले नाही, तर ‘मेटा’ नावाचे रि-ब्रँडिंग करून त्यांची उपजीविका धोक्यात आणलीय. त्यामुळे ‘फेसबुक’विरोधात कंपनी कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीला ‘फेसबुक’ने त्यांची ‘मेटा’ कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आल्याने ‘फेसबुक’ने 28 ऑक्टोबर रोजी मीडियाच्या आधारे आमच्या कंपनीचे ‘मेटा’ नाव मिटविण्याचा प्रयत्न करुन ‘फेसबुक’ला ‘मेटा’ म्हणून ‘रि-ब्रँड’ केल्याचे स्कुलिक यांचे म्हणणे आहे..

Advertisement

‘फेसबुक’ने ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा आणि स्वतःला ‘मेटा’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेटा कंपनी आता फेसबुकवर आवश्यक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकवर खटला दाखल करणार
स्कुलिक म्हणाले, की गेल्या तीन महिन्यांपासून ‘फेसबुक’चे वकील आमचे नाव त्यांना विकण्यासाठी आम्हाला त्रास देत आहेत. आम्ही अनेक कारणास्तव त्यांची ऑफर नाकारली. फेसबुक नि त्यांचे अधिकारी फसवणूक करणारे आहेत. त्यामुळे फेसबुकवर खटला दाखल करणार आहे.

Advertisement

दरम्यान, याबाबत ‘फेसबुक’कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement