SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ रविवार, 07 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी. चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल. काही निर्णयासाठी थांबावे लागेल.

वृषभ (Taurus) : व्यवसाय वाढीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या माणुसकीची इतरांना कल्पना येईल. धडपडया वृत्तीवर संयम ठेवावा.

मिथुन (Gemini): आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. आजचा दिवस चांगला जाईल. महिला सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल.

कर्क (Cancer): मानसिक प्रसन्नता लाभेल. जुन्या मित्रमंडळींशी संवाद होईल. नवीन गोष्टी जाणून घेता येतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

सिंह (Leo) : आपल्या वागणुकीने वाहवा मिळवाल. पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभाचे योग. घेतलेला निर्णय योग्य ठरेल.

कन्या (Virgo): जोडीदाराच्या सद्गुणांनी आनंद मिळेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल.

तूळ (Libra) : कर्ज फेडीचे एक पाऊल पुढे टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. धार्मिक आवड वाढीस लागेल.

वृश्चिक (Scorpio) : तुमच्या बोलण्याचा घरातील लोकांवर प्रभाव पडेल. आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. बोलण्यात खंबीरपणा ठेवावा.

धनु (Sagittarius) : कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. तुमच्याबाबत इतरांचा गैरसमज होऊ शकतो.

मकर (Capricorn): कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. संतती विषयक काळजी वाटेल.

कुंभ (Aquarius) : कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल.

मीन (Pisces) : मित्रांची संगत तपासून पहा. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल.

Advertisement