SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फायदेशीर! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा लाखो रुपये..

जर तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन करत असाल, तर आता तुम्हाला तुमच्या पैशाची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. भारतात पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना (Post Office Saving Schemes) उपलब्ध आहेत, या योजना देशातील इतर कोणत्याही सरकारी योजनांपेक्षा जास्त परतावा (Return) देत आहेत. पोस्टाच्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणे सुरक्षित मानलं जातं, असं म्हणतात.

आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) काय आहे?

Advertisement

छोट्या बचतीसाठी पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट ही योजना म्हणजे उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला फायदा कमवू शकता. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तुम्ही गुंतवू शकता, याविषयी तुम्ही पोस्टात जाऊन अधिक माहीती घेऊ शकता.

सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये (RD scheme of post office) 5.8% व्याजदर दिला जातो. किमान 100 रुपये पोस्ट ऑफिस आरडीमध्ये जमा करता येतात. या योजनेत पैसे गुंतवून तुमचे पैसे 12 वर्ष 5 महिन्यांत दुप्पट होतील.

Advertisement

आरडी (RD Account Duration) खात्याचा कालावधी साधारणपणे 6 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत असतो. काही बँकांमध्ये RD साठी किमान कालावधी 12 महिन्यांचा असतो. सध्या पोस्ट ऑफिस आरडीला बँकेच्या आरडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. हे व्याज दर तिसऱ्या महिन्याला चक्रवाढ रकमेद्वारे जोडले जाते. या योजनेतून जर तुम्हाला अधिक नफा हवा असेल तर तुम्ही लॉन्ग टर्मसाठी पैसे गुंतवणे चांगले ठरेल.

मॅच्युरिटीची रक्कम कशी काढाल?

Advertisement

जर तुम्हालाही आरडीत गुंतवणुक करून बचत करायची असेल, ते त्याआधी तुम्ही किती रक्कमेची बचत करू शकता हे तपासा. वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे कॅल्क्युलेटर आहेत. तसेच, याशिवाय एक सोपी पद्धतही आहे ज्याद्वारे आरडीमध्ये मॅच्युरिटीच्या रक्कमेची गणना आपण करू शकता.

👉 A = P*(1+R/N)^(Nt)

Advertisement

▪️ A – मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम आहे.
▪️ P – आरडीमध्ये जमा केलेली रक्कम.
▪️ N – कंपाऊंडिंग फ्रीक्वेन्सी आहे.
▪️ R – व्याजदर आहे.
▪️ t – आरडी खात्याची कालावधी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement