SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भाऊबीजेला लाडक्या बहिणीला आवडेल असे आकर्षक गिफ्ट देण्यासाठी वाचा ‘या’ भन्नाट आयडिया..

आज भाऊबीज! रक्षाबंधनानंतर भावा-बहिणीचा सण येतो तो भाऊबीज. आता गिफ्ट (Bhaubeej/Bhaidooj Gifts) काय द्यायचं म्हटल्यावर भाऊरायांना काही समजेनासे होते. बहिणींना गिफ्ट म्हणा किंवा पैसे ओवळल्यानंतर ताटामध्ये ठेवणं आलंच! मग आता करायचं काय? जाणून घ्या काही गिफ्ट्स देण्यासंबंधी आयडिया..

भाऊबीजेला द्या ‘हे’ खास गिफ्ट्स!

Advertisement

पैसे (Cash): तुम्हाला जर वाटत असेल की, बहिणीला तिच्या मनाजोगे खरेदी करण्याची संधी द्यावी, ज्यात ती खुश होत असेल त्या गोष्टी करण्यासाठी, तिच्या काही अपूर्ण इच्छा जसे मोबाईल, पर्स, कपडे घेण्यासाठी तुम्ही सरळ तिला पैसे देऊ शकतात म्हणजे तिला हवे तसे ती आनंदात खर्च करेल.

चॉकलेट्स (Chocolates): बहिणीला तिच्या आवडीचे चॉकलेट्स जसे की, Dairy Milk Silk, Kitkat, Munch, 5 Star अशा व इतर बरेच नवनवीन चॉकलेट्स आपण एका गिफ्ट बॉक्समध्ये पॅक करून देऊ शकतो. बहिणीला आवडणारे चॉकलेट्स गिफ्ट (Gifts for Sisters) दिल्याने ती खुश होईल.

Advertisement

ड्रेस (Dress): लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कपड्यांची आवड असतेच पण हौसेपोटी काही जणी साड्या घेतातच. त्यात आपल्या भावाने खरेदी करून दिलेला ड्रेस मिरवणं म्हणजे भारीच गोष्ट! आज बहिणीला तिला आवडणारा किंवा अनेक ड्रेसचे (Top Jeans, kurti, Salwar, पॅकिंग करून गिफ्ट देऊ शकता. आजकाल महागडे ड्रेस किंवा फॅशनेबल राहणेही मुलींना आवडते, मग त्यानुसारही साडी खरेदी करून देऊ शकता.

ज्वेलरी (Jewellery): बहुतांश मुलींना नेकलेस किंवा चैन घालायला खूप आवडते. चैनमध्ये बहिणीच्या नावाचे पहिले इंग्रजी अक्षर असणाऱ्या चैनही बाजारात उपलब्ध आहेत, फक्त तुम्हाला जराशी शोधाशोध करावी लागणार आहे. अंगठी (Ring), ब्रेसलेट( Bracelete), वेगवेगळे सेट (Jewellery Set), कानातले (Earings), गळ्यातले (Necklace), नथ (Nose ring) इत्यादी ज्वेलरी तुम्ही बहिणीला देऊ शकता. जर बजेट कमी असेल तर वरील दागिने इमिटेशन ज्वेलरीच्या स्वरूपातही देऊ शकता. तसेच तुम्ही चांदीचे दागिनेही बहिणीला करून देऊ शकता.

Advertisement

पर्स (Purse): आपल्या लाडक्या बहिणीला सर्व चॉकलेट्स पॅक करून गिफ्ट देत असाल, त्याच बजेटमध्ये तुम्हाला पर्सही देता येईल. सर्वच भाऊ कमावते नसतात. पण आज बहिणीच्या भावाला काहीतरी देणं लागतंच म्हणून बाजारात दुकानांमध्ये कमीत कमी 100 रुपयांपासून पर्स उपलब्ध आहेत. दुकानांत इतर पर्याय जसे की, लिपस्टिक, बांगड्या, बिंदी, बॉडी-स्प्रे (Lipstick, Bangles, Bindi, Deo) देखील असतात. तेसुद्धा भेट देऊ शकतात. म्हणजेच तिचा मेकअप बॉक्स (Makeup Box) बऱ्यापैकी रेडी होईल. तसेच मोठं काही करण्यासाठी जर आवड असेल तर तुमच्या बहिणीला पार्लरही टाकून देऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement