SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट! आता समीर वानखेडे नाही तर ‘या’ नवीन अधिकाऱ्याच्या हाती तपास..

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात, आर्यन खान, (Aryan Khan) समीर वानखेडे (Samir Wankhede), किरण गोसावी (Kiran Gosavi) ही नावे अधिक चर्चेत येत आहेत. या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून क्रुझ ड्रग्ज केससोबत सहा प्रकरणांचा (Cruise drug case and other 5 cases) तपास काल काढून घेण्यात आल्याची माहीती आहे.

एनसीबीची (NCB) नवी टीमकडून मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. हा तपास आता हे केंद्रीय पथक करणार असल्याचं समजतंय. या पथकाचं नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह करणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यादेखील केसचा समावेश आहे. समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई केल्याची सांगण्यात येत आहे.

Advertisement

प्राप्त माहितीच्या आधारे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्याकडील झोनच्या 6 प्रकरणांची चौकशी दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाणार आहे, ज्यात आर्यन खान प्रकरण आणि इतर 5 प्रकरणे यांचा समावेश आहे आणि हा शासनाचा निर्णय होता.

समीर वानखेडे यांनी एका वृत्तसंस्थेला माहीती दिली की, “मला तपासातून काढण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या ना कोणत्या केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिका दाखल केली होती. म्हणून आर्यन प्रकरण व समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी टीम करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीममध्ये हा एक समन्वय आहे.”

Advertisement

कोण आहेत संजय सिंह?

संजय सिंह हे 1996 च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी (IPS Sanjay Singh) आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या सेवेमध्ये अनेक प्रमुख पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ओडिशा पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून ते रुजू झाले होते. मग त्यानंतर ओडिशा पोलीस दलात ते महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सीबीआयमध्ये (CBI) त्यांनी देशाची सेवा केली. तिथे अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली. सीबीआयमध्येही त्यांनी महानिरीक्षक या पदावर काम पाहिले होते. तिथून ते एनसीबीमध्ये आले. आता आयपीएस संजय सिंग हे उपमहासंचालक (ऑपरेशन) या पदाचा कार्यभार पाहत आहेत. सिंह यांनी याआधीही अनेक हायप्रोफाइल प्रकरणे सक्षमपणे हाताळलेली आहेत. आता त्यांना मुंबईतील ही हायप्रोफाईल प्रकरणं सोपवली आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement