सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अनेक लाभ दिले आहेत. दिवाळीला बोनस, शिवाय टीए-डीएमध्येही मोठी वाढ झालीय. तसेच महागाई भत्त्याची पूर्वीची थकबाकीही कर्मचाऱ्यांना जोडून देण्यात आली.
एका मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यासह पगारातही वाढ झालीय. त्याचा लाभ या कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून देण्यात येणार आहे. ही पगारवाढ ‘हाऊस रेंट अलाउंस’ (HRA)मध्ये केली जाणार आहे.
घरभाडे भत्ता लागू करण्याची मागणी 11.56 लाख केंद्रिय कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावर अर्थ मंत्रालयाने विचारमंथन सुरू केलेय. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2021 पासून कर्मचाऱ्यांना ‘एचआरए’ मिळेल.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ झाल्याने त्यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि वाहतूक भत्ताही (टीए) वाढणार आहे. या दोन्ही बाबी पगारात भर घालतात, त्यामुळे आधीच मिळालेला पगार आणखी वाढणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळालाय.
सातव्या वेतन आयोगानुसार, महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढल्यास पगारही वाढतो. सातव्या वेतन आयोगाने आपल्या शिफारशीत प्रस्तावित केले होते, की जेव्हा डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेव्हा ‘एचआरए’ देखील वाढेल..हा दर 8, 16, 24 टक्क्यांवरून 9, 18 आणि 27 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
उदा. मूळ पगार 30,000 रुपये असल्यास सुमारे 5400 ते 8100 रुपयांचा लाभ मिळणार आहे. घरभाडे भत्ता दरमहा किमान 5400 रुपये निश्चित करण्यात आलाय. त्यापेक्षा कमी असू शकणार नाही.
‘एचआरए’ हा पगाराचा केवळ एक भाग आहे, जो एखाद्या कंपनीकडून त्या शहरातील राहण्याचा खर्च लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना दिला जातो. कंपनी त्याची पगार रचना, पगाराची रक्कम आणि कर्मचारी ज्या शहरात राहतो, अशा बाबींवर एचआरए देण्यात येतो..
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511