SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 05 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. आप्तस्वकीय सहकार्य करतील.

वृषभ (Taurus) : लाभदायक दिवस जाईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, आत्मविश्वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील.

मिथुन (Gemini): ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

कर्क (Cancer): बोलताना जपून बोला, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील. आवडी-निवडी शोधाल.

सिंह (Leo) : आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकतात असे करणे तुमच्या मूडला खराब करेल.

कन्या (Virgo): तुमचा किमती वेळ खराब होईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. धार्मिक ग्रंथ वाचाल.

तूळ (Libra) : जुने आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो.

वृश्चिक (Scorpio) : कुठल्या पार्क मध्ये फिरतांना आज तुमची भेट कुणी अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते.

धनु (Sagittarius) : नियोजन आवश्यक आहे. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : व्यावसायिक प्रगती होईल. अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. पैसा येईल व प्रलंबित कामांना गती मिळेल.

कुंभ (Aquarius) : कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. पर्यटनाचा आनंद घ्याल.

मीन (Pisces) : घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. जोडीदाराची साथ लाभेल.

Advertisement