SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाच्या कॅप्टन पदासाठी राहुल द्रविडची या खेळाडूला पसंती..! कोण असेल विराटचा उत्तराधिकारी..?

टी-२० वर्ल्ड कपनंतर विराट कोहली याने टी-२० संघाची कॅप्टनसी सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. शिवाय सध्याचे हेड कोच रवी शास्री व इतर सहकारीही टीम इंडियाला बाय बाय करणार आहेत. रवी शास्री यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याची निवड करण्यात आली आहे..

हेड कोच म्हणून राहुल द्रविडची नियुक्ती झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघात अनेक बदल होणार आहेत. मात्र, टीम इंडियाचा टी-२० संघाचा कॅप्टन कोण असणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. न्युझीलंड दौऱ्यासाठी के. एल. राहुलच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघातील दिग्गजांना आराम दिला जाणार असल्याचेही समोर येतेय. मात्र, टी-२० संघाचा कायमस्वरुपी कर्णधार कोण असेल, हे अजून ठरलेले नाही..

विराटनंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांची नावे कप्तान पदासाठी सुचविली आहेत. याबाबत मुख्य कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड याने नुकतेच आपले मत व्यक्त केले. द्रविडने व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी रोहितला पहिली पसंती दिल्याचे समजते.

Advertisement

रोहितचा चांगला रेकाॅर्ड..
एका मुलाखतीत द्रविडने रोहितनंतर के.एल. राहुल याचे नाव घेतले. आयपीएलमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच विजेतेपदे मिळाली आहेत. त्याच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने निदाहास ट्रॉफी आणि आशिया कप-२०१८ जिंकला होता..

दरम्यान, टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपर्यंत टीम इंडिया पोहोचू शकली नाही, तर विराटकडून वन-डे फॉरमॅटचेही कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून कोणाला नेमते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement