SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता या ग्राहकांनाच मिळणार गॅस सबसिडी, मोदी सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत..!

एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दुसरीकडे गॅसचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. ही सबसिडी कधी सुरु होणार, ती सगळ्यांनाच मिळणार का, याबाबत सर्वसामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत..

पेट्रोल-डिझेलवर कर कपात केल्यानंतर आता गॅस सिलिंडरबाबतही मोदी सरकारने दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. गॅसवरील अनुदान देण्याबाबत मोदी सरकारकडून स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नसले, तरी एक मोठी बातमी समोर येतेय…

Advertisement

एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांना यापुढील काळात किमान प्रति सिलिंडर 1,000 रुपये मोजावे लागतील, अशी सरकारची योजना आहे. अर्थात, याबाबत सरकारचे मत पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. सध्या सरकारसमोर दोन पर्याय आहेत. एक अनुदानाशिवाय सिलिंडर पुरवठा करणे, किंवा ठराविक ग्राहकांना सबसिडी देणे.

सरकारने अनुदानाबाबत अनेकदा चर्चा केली असली, तरी अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नसल्याचे सांगण्यात येते आहे..

Advertisement

मोदी सरकारच्या मनात काय..?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना सुरु केली होती. उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 8.8 एलपीजी कनेक्शन आहेत. 2022 मध्ये या योजने अंतर्गत आणखी एक कोटी कनेक्शन जोडण्याचा विचार सुरु आहे.

एका वृत्तानुसार, उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना सबसिडीचा लाभ दिला जाणार आहे. उर्वरित ग्राहकांसाठी सबसिडी समाप्त होऊ शकते, तसेच 10 लाख रुपये उत्पन्नाचा नियम तसाच लागू राहू शकतो, अशी योजना मोदी सरकार आखत असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

कोरोनामुळे 2020 मध्ये जगभर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने एलपीजी सबसिडीच्या आघाडीवर भारत सरकारला मदत झाली. मे 2020 पासून काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी सबसिडी बंद करण्यात आलीय.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement