कोरोनावर उपचार करणे आता हळूहळू सोपे होताना दिसत आहे. आता इंग्लंडच्या सरकारने कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीव्हायरल गोळीला (Antiviral Tablet in UK) सशर्त वापरास मंजुरी दिली आहे. मोल्नुपिरावीर असे या गोळीचे नाव आहे. हे औषध जर्मन औषध निर्माता कंपनी मर्क फार्माचे आहे. कोरोनावरील एखाद्या औषधाला मंजुरी देणारा ब्रिटन जगातील पहिलाच देश ठरला आहे, इंग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी ही माहीती दिली आहे.
कोरोनावर एखाद्या औषधास मंजुरी देणारा इंग्लंड जगातील पहिलाच देश
अनेक महिन्यांपासून जगावर संकट आणणाऱ्या कोरोनावर उपचारासाठी आता जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता दिली आहे. ही गोळी कधी उपलब्ध होणार, याबाबत स्पष्टता नसली तरी ही गोळी उपचार करण्यायोग्य आहे, हे ओळखणारा इंग्लंड पहिलाच देश ठरला आहे.
जगात कोणत्याही ठिकाणी कोरोनावर नेमके औषध उपलब्ध नव्हते. पण, मोल्नुपिरावीर (Molnupiravir) कोविड-19 ची लक्षणे जलद गतीने कमी करत असते. यातून कोरोना रुग्ण लवकर बरे होतात, असं संशोधनात आढळलं आहे.
सध्या 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कोरोनाबाधित रुग्णांना ही गोळी वापरण्यास मंजुरी (First antiviral pill Molnupiravir to treat Covid-19 approved in the UK) दिली आहे. या औषधाचे नाव ‘मोल्नुपिरावीर’ (molnupiravir) आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल.
ही अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
मूळची जर्मनची असलेल्या औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने molnupiravir औषध शोधले आहे. ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की, त्यांनी ‘मोल्नुपिरावीर’चे 4,80,000 डोस घेतले आहेत.
दरम्यान, अमेरीका, युरोप आणि इतर काही देशांमधील सध्या या गोळीच्या अधिक चाचण्या चालू आहेत. अमेरीकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने मागील महिन्यामध्ये सांगितले होते की, ते गोळीची सुरक्षा आणि ही गोळी किती परिणामकारक आहे, हे शोधण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावणार आहेत. ब्रिटननंतर त्या ठिकाणी सुद्धा यास मंजुरी मिळेल अशी आता शक्यता वाढत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511