SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार? आज ओपनिंगला रोहित शर्मा की ईशान किशन, वाचा..

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट (ICC T-20 Worldcup-2021) स्पर्धेत बुधवारी सायंकाळी साडे सात वाजतापासून शेख झायेद स्टेडियमवर आज सुपर-12 फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. याच फेरीत लागोपाठच्या दोन पराभवांमुळे भारताचं विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं आव्हान जवळजवळ संपलं आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकल्यास त्यांचा सुपर-12 (Super-12) फेरीतील हा पहिला विजय ठरेल. यासोबतच पुढील 3 सामने जिंकण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे.

भारतीय संघात बदल होणार?

आज अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पांड्याने काही खास कामगिरी केली नाही. म्हणून आज सुर्यकुमार यादवला संधी देण्याचं ठरवलं जाऊ शकतं. गोलंदाजीची कमान पाहता वरूण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विनचा समावेश होईल, हे जवळपास निश्चितच झालं आहे असं समजा.

सामना कधी कुठे आणि कसा पाहणार?

▪️आज भारत आणि अफगाणिस्तान या दोन संघांतील सामना अबु धाबी स्थित शेख झायद स्टेडियमवर खेळवला जाणार

▪️खेळपट्टी: अबुधाबीची खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते तर मोठी धावसंख्या करणे फलंदाजीसाठी अवघड जाते.

▪️ भारत आणि अफगाणिस्तान सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आणि नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कप्तान संध्याकाळी 7.00 वाजता मैदानावर येणार

▪️ भारत आणि अफगाणिस्तान सामन्याचे लाईव्ह टेलीकास्ट (Live Telecast) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Star Sports Network) चॅनेल्सवर पाहायला मिळणार आहे.

▪️ भारत आणि अफगाणिस्तान सामन्याची ऑनलाईन लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार (india vs Afganistan T-20 Match Live Streaming on Disney+ Hotstar) वर पाहायला मिळणार आहे.

भारताचा संभाव्य संघ

विराट कोहली (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि सूर्यकुमार यादव (यामधून अंतिम 11 खेळाडू निवडले जातील.)

अफगाणिस्तानचा संभाव्य संघ

मोहम्मद नबी (कर्णधार), असगर अफगान, फरीद अहमद, गुलाबदीन नायब, हामिद हसन, हश्मतुल्लाह शहीदी, हजरतुल्लाह जजई, करीम जन्नत, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नवीन-उल-हक, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), राशिद खान आणि उस्मान गनी. (यामधून अंतिम 11 खेळाडू निवडले जातील.)

आज ईशान किशन की रोहित शर्मा? ओपनिंगला कोण येणार?

टी-20 विश्वचषकातील सराव सामन्यात ईशान किशनने ओपनिंगला येऊन तुफान फलंदाजी केल्याने न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात पुन्हा ओपनिंग फलंदाज म्हणून ईशान किशनची निवड करण्यात आली, असं विक्रम राठोड यांनी स्पष्ट केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ईशान किशन (Ishan Kishan) के एल राहुलबरोबर (K.L. Rahul) ओपनिंगला आला खरा पण अपयश त्याच्या हाती आले. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकवर तर विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पण भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. रोहित शर्माला ओपनिंला का पाठवण्यात आलं नाही, यावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. म्हणून अनुभवी रोहित शर्मा आज ओपनिंगला येऊ शकतो, असा अंदाज आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement