SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 03 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : वैवाहीक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ (Taurus) : अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. तुमची मुले आज तुमची प्रशंसा करतील. आज एका आगळ्यावेगळ्या घडामोडीला प्रतिसाद द्याल.

मिथुन (Gemini): कुणाशीही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. सुखी संसार जाणवेल.

कर्क (Cancer) : भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आईकडे जास्त लक्ष द्याल.

सिंह (Leo) : धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल.

कन्या (Virgo) : तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. चटपटीत खाऊ वाटेल.

तूळ (Libra) : थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. आज संघर्ष असला तरी यश मिळेल.

वृश्चिक (Scorpio) : आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. पाणी भरपूर प्या.

धनु (Sagittarius) : सकाळची सुरुवात खूप चांगली होईल. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी दिवस खूप चांगला जाईल.

मकर (Capricorn) : व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या बुधवारी सुटू शकते. आज तुम्हाला चांगल्या कामाचा सल्ला मिळेल. सकाळीच चांगली बातमी मिळेल.

कुंभ (Aquarius) : चांगली बातमी मिळण्याची चिन्हे आहेत. समाजात तुम्हाला योग्य मान-सन्मान मिळेल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

मीन (Pisces) : नोकरीच्या दिशेने प्रगती होईल. तब्येत ठीक राहील पण अजिबात गाफील राहू नका. आर्थिक व्यवहाराशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या.

Advertisement