पती-पत्नीमधील जेवढे वाद, तितकं प्रेम जास्त असा आपला समज आहे. पण तुम्हाला माहीती आहे का, वाद होतात इथपर्यंत ठीक आहे पण त्या वादाचं कारणही तेवढंच सामान्य असतं का? किंवा त्या कारणामुळे पती किंवा पत्नीच्या मनात आयुष्यभर खंत किंवा शंका राहते का? मनात काही ठेवून उगाच चेहऱ्यावर हसू दाखवून नातं चाललंय म्हणून चाललं आहे का, असे अनेक प्रश्न पडतात.
जेव्हा एखादा मोठा वाद होत असेल तर त्याचं कारण छोटं जरी असलं तरी ते नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण बनू शकतं. बऱ्याच वेळा ही भांडणं पुढे जाऊन अशी वाढतात की, पती आणि पत्नीला शेवटी न्यायालयाचा मार्ग अवलंबावा लागतो. मग पती आणि पत्नीपैकी कोणी एकानेच पुढाकार घेऊन नातं जपावं की नेहमी असंच करून पुन्हा तीच वादाची आडकाठी संसारात आणत बसावं तर मग अशा वेळी काय करावं असं वाटतं.
‘कौटिल्य’ या नावाने प्रसिद्ध असलेले महान रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांना केवळ राजकारणच नाही तर समाजातील जवळपास सर्वच विषयांची सखोल माहिती होती. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्राची रचना केली, ज्यामध्ये त्यांनी समाजातील जवळपास सर्वच विषयांशी संबंधित समाजोपयोगी आणि पती-पत्नीच्या नात्याबद्दल (Husband-Wife Relationship) महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आचार्य चाणक्यजी काही गोष्टींची तुलना स्लो पॉयझनशी करतात, ज्यामुळे शेवटी नातेसंबंध नष्ट होतात.
नातं टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
अहंकार (Ego) : आचार्य चाणक्य (Acharya chanakya) यांनी सांगितल्यानुसार पती-पत्नी यांच्यातील नातं कमकुवत करण्यात अहंकार खूपच मोठी भूमिका बजावतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, पती आणि पत्नी दोघेही नात्यात समान आहेत. पती-पत्नीच्या नात्यात अहंकाराला स्थान नसावं. एकदा नात्यात अहंकार आला की ते नातं टीकणं अवघड होतं.
शंका घेणे (Doubt) : पती-पत्नीचं नातं संशय घेणारं नसावं. कारण शंकेमुळे अनेकदा नातं दुरावतं आणि लोक, प्रेमळ आणि जवळची नाती लांब जातात. नात्यात शंका आणि गैरसमज निर्माण झाले की ते पूर्णपणे संपतात. म्हणून शंका घेण्याआधी प्रश्न विचारा म्हणजे शंका निरसन होईल आणि ही देखील काळजी घ्या की समोरील पती किंवा पत्नीने उत्तरही देणं न टाळावं.
खोटे बोलणे (Lie) : आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, खोटं बोलण्याने विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं. अशा रीतीने कोणतंही नातं चालू शकत नाही. नात्यात खोटं बोललं की त्यात धोका देणं चालू झालं, अशी दुसरी बाजू असते. अशा परिस्थितीत पती-पत्नीच्या नात्यात कधीही खोटं बोलू नये. नातं हे विश्वासावर टिकतं, हे लक्षात ठेवावं.
आदर न करणे (Respect) : आचार्य चाणक्यजी सांगतात की, विश्वामध्ये प्रेमळ नातं पती-पत्नीचं आहे. या पती-पत्नीच्या नात्यामध्ये आदर दिला गेला तर सन्मान वाढतो आणि आपला जोडीदार चांगलं नातं मिळाल्याचं सार्थक मानतो. तर उलट सन्मान नसल्यामुळे काहीही अपशब्द बोलल्याने नातं तुटण्याची भीतीही राहते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511