SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, सर्वाधिक वापरले जाणारे हे फिचर केले बंद, युजर्सवर काय परिणाम होणार..?

सोशल मीडियातील सर्वात मोठे नाव म्हणजे, फेसबुक… जगभर या लोकप्रिय माध्यमाचे युजर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच फेसबूकने (facebook) आपले नाव बदलले होते. त्यानुसार फेसबूक आता ‘मेटा’ (Meta) या नावाने ओळखले जाणार आहे.

नामकरणाच्या बदलानंतर फेसबूकने आता आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. कंपनीने मंगळवारी (2 नोव्हेंबर) याबाबतची घोषणा केली. त्यानुसार फेसबुक आता ‘फेस रिकग्नीशन सिस्टम’ (Face Recognition system) बंद करणार आहे.

Advertisement

फेसबुकवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केल्यावर त्यात कोण कोण दिसतंय, हे युजर्सला आपोआप ओळखता येत असे. त्यानंतर फोटोतील व्यक्तीला टॅग करता येत असे, यालाच ‘फेस रिकग्नीशन सिस्टम’ असे म्हणतात. मात्र, फेसबूकने आता ही पद्धत बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

फेसबुकच्या या फिचरमुळे फोटो अपलोड केल्यानंतर आपोआप टॅगिंग यायला सुरुवात झाली होती. त्याचे नोटीफिकेशन युजर्सला येत असे. फेसबुकवर दररोज सक्रीय असणाऱ्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक युझर्सने या फिचरला परवानगी दिली आहे.

Advertisement

फेसबूकच्या निर्णयामुळे १ अब्जाहून अधिक लोकांनी वापरलेले हे फिचर हटविण्यात येणार आहे. सध्या जागतिक पातळीवर हे काम सुरु असून, येत्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कशामुळे घेतला निर्णय..?
फेसबुक युजर्सच्या सुरक्षेबाबत कायदेतज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत होते. ‘फेशीयल रिकग्नीशन’ पद्धतीबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावरुन अनेकदा वादही झाले. त्यामुळे फेसबूकने ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दरम्यान, हे फिचर बंद करण्याच्या फेसबुकच्या निर्णयावरूनही अनेकांनी टीका केलीय. कारण हे फिचर किरकोळ विक्रेते, रुग्णालये आणि इतर व्यवसायांमध्ये सुरक्षिततेच्या उद्देशाने लोकप्रिय आहे.

..तर परतही वापरता येणार..!
आता काही सेवांपुरते मर्यादित हे तंत्रज्ञान वापरता येणार आहे. त्यात तुमचे फेसबुक अकाउंट लॉक झाले असेल नि ते पुन्हा सुरू करण्यासाठी या फिचरचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement