SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोलिस भरतीची तयारी करताय? मग ‘हा’ बदललेला नियम तुम्हाला माहीत हवा…

राज्याच्या पोलिस दलातील भरती (Police Recruitment) प्रक्रियेत सरकारने काही बदल केला आहे. त्यामध्ये सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यानंतर प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल, तेव्हा लेखी परिक्षेअगोदर शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे. म्हणून यापुढे आता मैदानी चाचणीतील पास झालेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होणार?

Advertisement

राज्याच्या गृह विभागामध्ये जवजवळ साडेपाच ते सहा हजार पोलिस कर्मचारी (Police) प्रत्येक वर्षी सेवानिवृत्त होत असतात. कोरोनामुळे मागील काही महिन्यांत बऱ्याच पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या गुन्हेगारांवर आपला वचक ठेवण्यासाठी गृह विभागामधील संपूर्ण पदे भरलेली असणे गरजेचं आहे.

राज्यात महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होत असतात. यामुळे मागच्या व चालू वर्षी (2020-21) या दोन्ही वर्षातील रिक्‍त पदांची भरतीची प्रक्रिया एकत्रिपणे राबविली जाणार आहे. आताच्या वेळी 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरू आहे. या भरतीसाठी सुरुवातीस उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरू आहे.

Advertisement

तसं पाहिलं तर पोलीस भरतीत बऱ्याचदा बहुतांश उमेदवार मैदानी चाचणीत पुढे असतात, पण लेखी परीक्षेत खूप उमेदवार मागे पडतात. त्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील म्हणजेच खेडोपाड्यातील उमेदवारांची संख्या जास्त असते. त्यामुळे 2019 मध्ये पोलिस भरतीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता पुढील भरतीपासून केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयाने दिली.

मागील वर्षी (2020) आणि या वर्षी (2021) राज्यात जवळपास 13 हजार पोलिस शिपाई पदभरतीची प्रक्रिया एकत्रित राबविण्याचं नियोजन सुरू आहे. लवकरच बिंदुनामावली अंतिम केली जाणार आहे. शासनाची भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर 2021 नंतर ही पदभरती केली जाणार आहे, अशी माहीती संजीव कुमार, अप्पर पोलिस महासंचालक, (प्रशिक्षण व खास पथके) मुंबई यांनी दिली.

Advertisement

‘तो’ नवीन बदल आणि अधिक माहीती…

राज्यातील अनेक उमेदवार पोलिस भरतीसाठी रोज मेहनत करत असतात. त्यांनी भरतीचा अर्ज केल्यावर उमेदवारांना सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागत होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती. त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषत: ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे. पण आता असं होणं बंद होणार आहे. कारण त्यात फक्त पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे.

Advertisement

असंही व्हायचं की, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये अनेक जणांची छाती, उंची कमी असायची. हे टाळण्यासाठी आता सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार असून, त्यात जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येईल. राज्य सरकारच्या या नवा बदलामुळे लेखीत हुशार, पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्यांना बाहेर काढणे सोईचे होणार असल्याचं मत व्यक्त होतंय.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement