SpreadIt News | Digital Newspaper

व्हाॅटस् अ‍ॅपकडून 22 लाख अकाऊंटस् बॅन, तुम्हीही या चुका करीत नाही ना…?

व्हाॅटस् अ‍ॅप… इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप.. आजघडीला जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप… मात्र, एका निर्णयामुळे काही दिवसांपासून व्हाॅटस् अ‍ॅपची जोरदार चर्चा सुरु आहे. व्हाॅटस् अ‍ॅपने आपल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केलीय..

गेल्या काही दिवसांत व्हाॅटस् अ‍ॅपने तब्बल २२ लाखांहून अधिक अकाऊंटस् बॅन केले आहेत. युजर्सकडून करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आलीय. तसेच आपल्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी व्हाॅटस् अ‍ॅपने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येतं.

Advertisement

कशामुळे केली कारवाई..?
नव्या आयटी नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला आता ‘कंप्लायन्स’ रिपोर्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार व्हाॅटस् अ‍ॅपने नुकताच आपला मासिक रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला आहे. त्यात याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

आपल्या रिपोर्टमध्ये व्हाॅटस् अ‍ॅपने म्हटले आहे, की नियमांचं उल्लंघन करणाऱ्या युजर्सवर ही कारवाई करण्यात आलीय. सर्व युजर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

व्हाॅटस् अ‍ॅप (WhatsApp) युजर सेफ्टी रिपोर्टनुसार, एकूण बॅन संख्या 22 लाख 9 हजार इतकी आहे. इतर युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईसह या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी व्हाॅटस् अ‍ॅपने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले..

युजर्सची सुरक्षा लक्षात घेता अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स, या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

चुकूनही या गोष्टी करू नका
बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेषपूर्ण, वांशिक भेदभाव करणाऱ्या पोस्ट चुकूनही शेअर करु नका. कोणत्याही बेकायदेशीर, अनुचित प्रथेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट टाकल्यास अशी अकाउंट्स व्हाॅटस् अ‍ॅपकडून बॅन करण्यात येत आहेत.

तसेच व्हाॅटस् अ‍ॅपच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यास, त्याबाबत तुमची कोणी व्हाॅटस् अ‍ॅपकडे तक्रार केल्यास आणि त्यात तथ्य आढळून आल्यास अशी अकाउंट बॅन केली जाणार आहेत. त्यामुळे कोणताही आक्षेपार्ह कंटेट शेअर करू नका, तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवा.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement