SpreadIt News | Digital Newspaper

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपान्त फेरीचा सामना..? टीम इंडियासाठी कसे असेल सेमी फायनलचे गणित..?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये आता चांगलेच रंग भरल्याचे दिसत आहे. काही संघाची धडाक्यात वाटचाल सुरु असताना, विजेतेपदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या संघांची अवस्था दयनीय झाल्याचे दिसत आहे.

टीम इंडियाला स्पर्धेच्या सुरुवातीपासून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. दिग्गज खेळाडूंनी भरलेला भारताचा संघ मात्र आपल्या लौकीकाप्रमाणे खेळ करु शकला नाही. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला..

Advertisement

टी-२० वर्ल्ड कपमधील न्युझीलंडविरुद्धचा पराभवाचा इतिहास तरी टीम इंडिया पुसेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, न्युझीलंडच्या संघानेही भारताचा मोठा पराभव केला. त्यामुळे टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा पुढील मार्ग आता कठीण झाला आहे.

आता भारतीय संघाला स्पर्धेतील उर्वरित सगळेच सामने जिंकावे लागणार आहेत. एक जरी आणखी सामना गमावला, तरी उपांत्य फेरीचा रस्ता कठीण होणार आहे. शिवाय न्युझीलंड आणि अफगाणीस्तान संघाच्या सामन्यावरही भारताला नजर ठेवावी लागणार आहे..

Advertisement

दुसरीकडे ग्रुप १ मध्ये इंग्लड संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वच आघाड्यावर या संघाने उत्तम खेळ केल्याने या संघालाच आता विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे.

श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार मारताना इंग्लडने उपांन्त फेरीतील स्थान पक्के केले आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये उपान्त फेरी गाठणारा इंग्लंडचा पहिला संघ ठरला आहे. सोमवारी इंग्लडने श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव केला.

Advertisement

ऑस्ट्रेलिया- आफ्रिकेत शर्यत
ग्रुप १ मध्ये इंग्लडने उपान्त फेरीतील स्थान निश्चित केल्याने आता दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ सुरु आहे. ग्रुप-१ मधील अव्वल स्थान मिळविणाऱ्या संघाला उपान्त फेरीत ग्रुप-२ मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघाचे आव्हान असणार आहे.

..तर इंग्लंडविरुद्ध भारत सामना
न्युझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. मात्र, या संघाच्या साऱ्या आशा अफगाणिस्तान संघांवर लागल्या आहेत. अफगाणिस्तान संघाने न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात चमत्कार केल्यास भारतीय संघ ग्रुप-२ मधून दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतो आणि त्यांचा सामना इंग्लंडविरोधात होऊ शकतो..

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement