SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराटनंतर रोहित नव्हे, ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन..? न्यूझीलंड मालिकेत दिग्गजांचा पत्ता कट होणार..

यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या वर्ल्ड कपनंतर विराट भारतीय संघाच्या टी-२० कप्तानपदाला अलविदा म्हणणार आहे. नंतर भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्मा असेल, अशा चर्चा रंगल्या होत्या..

दरम्यान, याबाबतचे उत्तर आता समोर आले आहे. एका नव्या खेळाडूचे नाव समोर येत आहे, ते म्हणजे, भारताचा तडाखेबंद ओपनर के. एल. राहुल..  टी-20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी टी-२० मालिकेत राहुलकडे टीम इंडियाची धुरा दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

सलामीवीर के. एल. राहुलला नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनविले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये, दुसरा रांची तर तिसरा सामना कोलकातामध्ये होणार आहे.

न्युझीलंड दौऱ्यासाठीच कॅप्टन..?
दरम्यान, न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठीच फक्त राहुलला कर्णधार नेमले जाऊ शकते. सध्याच्या टीममधील बहुतेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली जाईल. त्यामुळे राहुल कर्णधार होणार असल्याचे समजते. या मालिकेसाठी प्रेक्षकांनाही परवानगी दिली जाणार आहे.

Advertisement

टी-20 वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळेच के.एल. राहुलकडे या दौऱ्यासाठी नेतृत्व दिले जाणार आहे. विराटनंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार निवडण्यासाठी भारतीय निवड समितीची लवकरच बैठक होणार असल्याचे ‘बीसीसीआय’मधील सूत्राकडून समजले.

यांना संधी, यांची गच्छंती..
दरम्यान, न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाड, आवेश खान, युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाईल. फिटनेस नि खराब फॉर्ममध्ये असल्याने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमारची हकालपट्टी निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement